33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमुंबई‘लय भारी’चे विषय सामान्यांना आपले वाटतात : धनंजय मुंडे

‘लय भारी’चे विषय सामान्यांना आपले वाटतात : धनंजय मुंडे

टीम लय भारी

मुंबई : आमचे मित्र तुषार खरात यांनी दीड वर्षापूर्वी सहज सुरू केलेले हे पोर्टल आज संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाले आहे. एवढ्या कमी वेळात ‘लय भारी’ मोठे होण्याचे कारण की, वाचकांना लय भारीच्या बातम्या आपल्या वाटतात, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ‘लय भारी’च्या टीमचे देखील कौतुक केले (Dhananjay Munde also praised the team of Lay Bhari).

मुंडे पुढे म्हणाले, ‘लय भारी’चे वेगळेपण म्हणजे बातम्यांची भाषाशैली साधी, सरळ आणि सोपी असते. त्यामुळे सामान्य वाचकांना या बातम्या चटकन समजतात. त्यामुळेच वाचक ‘लय भारी’ पोर्टलकडे आकर्षित होतात. यामुळे वाचकांनी ‘लय भारी’ पोर्टलला डोक्यावर घेतले आहे.

‘लय भारी’च्या कार्यालयाचा शुभारंभ; बाळासाहेब थोरात – धनंजय मुंडेंनी केले तोंड भरून कौतुक

‘लय भारी’चे धाडस तरूणांसाठी प्रेरणादायी : बाळासाहेब थोरात

‘लय भारी’वर राजकीय, सामाजिक, विकासाभिमूख मुद्यांसह समाजातील सर्व घटकांना न्याय दिला जातो. सर्व प्रकारच्या बातम्यांचा बारकाईने अभ्यास केला जातो. ‘लय भारी’चे आणखी एक विशेष म्हणजे कोणाकडे जी बातमी नसते ती बातमी ‘लय भारी’ वेब पोर्टलवर उपलब्ध असते. त्यामुळे ‘लय भारी’ हे खरंच ‘लय भारी’ आहे. ‘लय भारी’ ने भविष्यात ग्रामीण भागातील प्रश्न, समस्या मांडाव्यात. राजकीय -सामाजिक विषयांना वाचा फोडावी, असे सांगत धनंजय मुंडे यांनी ‘लय भारी’च्या सर्व टीमला भरभरून शुभेच्छा दिल्या (Dhananjay Munde congratulated the entire team of Lay Bhari).

Dhananjay Munde also praised the team of Lay Bhari
धनंजय मुंडे आणि तुषार खरात

‘लय भारी’ कार्यालयाचा उद्घाटन सोहळा

Woman withdraws rape complaint against Dhananjay Munde

‘लय भारी’ वेब पोर्टलने महाराष्ट्राभर आपले वर्चस्व निर्माण केले आहे, यापुढे हे वेब पोर्टल देशभर आपले नाव लौकिक करेल. बातमीतला वेगळेपणा आणि कोणतीही भीती न बाळगता बातम्यांच्या मागे दडलेल्या बातम्या लोकांसमोर आणते, त्याच बरोबर प्रत्येकांच्या मनात असलेले विषय प्रकाशात आणून प्रशासनासमोर आणि जनतेसमोर मांडत असते त्यामुळे ‘लय भारी’ हे वेब पोर्टल लोकांना आपलेसे वाटते. या वेब पोर्टलने लोकांच्या मनात खोलवर आपली जागा निर्माण केली आहे (Dhananjay Munde said This web portal has created its place deep in the minds of the people).

‘लय भारी’ या वेब पोर्टलने लोकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. बातमीतला साधेपणा आणि सरळता यामुळे या वेब पोर्टलची छाप लोकांवर पडली आहे. लय भारी हे वेब पोर्टल खमकी भूमिका घेत सर्वसामान्य लोकांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडत असते, असे धनंजय मुंडे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी