28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबई'टाटा मॅरेथॉन'मध्ये धनंजय मुंडेंच्या पीएंची यशस्वी दौड !

‘टाटा मॅरेथॉन’मध्ये धनंजय मुंडेंच्या पीएंची यशस्वी दौड !

मुंबईत मागील रविवारी झालेल्या टाटा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये (TATA Mumbai Marathon) विविवध वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मागील काही वर्षे चांगल्या आरोग्यासाठी धावण्याचे महत्व अधोरेखित करणारी ही मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे मुंबईची ओळख झाली आहे. प्रत्येकाचा या स्पर्धेत धावण्याचा हेतू वेगळा होता. कोणी या स्पर्धेतील नावीन्य अनुभवण्यासाठी, तर कोणी शारीरिक तंदुरुस्तीसाठी, तर कोणी कुतूहल म्हणून या स्पर्धेत सहभागी झाला होता. याच स्पर्धेतील थरार अनुभवण्यासाठी सहभागी झालेल्या परळीच्या प्रशांत जोशी यांनी विक्रमी वेळेत ‘ड्रीम रन’चा टप्पा पार केला आहे. साधारण सहा किलोमीटरच्या या ‘ड्रीम रन’ मध्ये विक्रमी वेळेत अंतर पार केल्यानंतरही जोशी यांनी १५ किलोमीटरचा टप्पा गाठला. त्यामुळे सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Dhananjay Munde PA Prashant Joshi completed the dream run in record time)

माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांना व्यायामाची आवड आहे. मागील १२ वर्षे मुंबईत असूनही व्यस्त दिनक्रमामुळे या स्पर्धेतील उस्त्फुर्तता त्यांना अनुभवायला मिळत नव्हती. यंदा मात्र त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. सुरुवातीला आपल्याला ही स्पर्धा पार पाडता येईल की नाही याबाबत जोशी यांच्या मनात साशंकता होती. पण शरीरसंपदेबाबत नेहमीच जागरूक असलेल्या जोशी यांनी या स्पर्धेतील टप्पा विक्रमी वेळेत पार पाडला. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणाऱ्या जोशी यांनी हे जीवन मुक्तपणे जगता आले पाहिजे, असा संदेश या ‘ड्रीम रन’ च्या माध्यमातून दिला आहे. आयुष्य भरभरून जगता आले पाहिजे, आपल्या धकाधकीच्या जीवनात वेळ काढून आपल्या आशा-आकांक्षा पूर्ण करता आल्या पाहिजेत, हा त्यांचा जीवन जगण्याचा मंत्र आहे. या स्पर्धेतील अनुभव कथन करणारी एक सुंदर पोस्ट त्यांनी ‘फेसबुक’वर लिहिली आहे.

१५ तारखेला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे 5 वाजल्यापासून टाटा मॅरेथॉनला सुरुवात झाली, यामध्ये 42 किमी महा मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, ड्रीम रन, चॅम्पियन डिसेबीलिटी रन अशा विविध प्रकारांचा समावेश होता. सतत धावणारी, कधीही न थांबणारी मुंबईची गती कोरोनाकाळात मात्र मंदावली. मात्र, दोन वर्षांनी झालेल्या या टाटा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुंबईची तीच ‘उत्स्फूर्तता’ पुन्हा पाहायला मिळाली. त्याच जोमाने या स्पर्धेत ‘रन लाईक मुंबई’ ही थीम घेऊन विविध वयोगटातील हजारो लोकांनी सहभाग घेतला. बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा टाटा मुंबई मॅरेथॉनचा ब्रँड अँबेसेडर होता. या स्पर्धेत विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला होता.

हे सुद्धा वाचा

VIDEO : स्पर्श चॅरिटेबल ट्रस्टची “डिजिटायझेशन आणि डिजीटल डिव्हाईड इन एज्युकेशन” मोहीम

म्हाडामार्फत एनटीसी मिलवरील ११ चाळींचा होणार पुनर्विकास

बालाजी ऑईल मिलच्या मालकाकडून 8 लाखांची खंडणी उकळणाऱ्या न्यूज 24च्या पत्रकारासह 8 जण पोलिसांच्या ताब्यात

आपले अनुभव कथन करणारी एक सुंदर पोस्ट त्यांनी ‘फेसबुक’वर अपलोड केली आहे :

#Dream_Run Completed…!

मागील बारा वर्षापासून मुंबईत असलो तरी मुंबईकर म्हणून ज्या अनेक गोष्टी करायच्या असतात त्या करायच्या व अनुभवायच्या राहून गेल्या होत्या, त्यापैकीच एक म्हणजे मुंबईत होणारी प्रतिष्ठेची टाटाची मॅरेथॉन….
मागील बारा वर्षापासून प्रत्येक वर्षी या मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचा अशी इच्छा होती, मात्र तो योग आला तो यावर्षी! त्याचे कारण म्हणजे शनिवारी आणि रविवारी मुंबईत असणे…..
तसं मला चालणं नवीन नाही; मात्र मॅरेथॉनमध्ये धावणे हा प्रकार मात्र माझ्यासाठी पहिलाच होता…. जमेल का नाही या विचाराने सर्वात छोटी सहा किलोमीटरची ड्रीम रन यासाठी मी निवडली.
ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची तारीख उलटून गेल्यानंतरही मुंबई महापालिकेतील श्री रणजीत ढाकणे साहेब आणि त्यांचे सहकारी श्री राठोड साहेब यांच्या सहकार्यामुळे नोंदणी करता आली. काल सायंकाळी त्यासाठीचे कीटही मिळाले आणि याच उत्साहात नवीन शूजही विकत घेतले…
यावर्षीची थीम होती #रनलाईकमुंबई अगदी तसेच आहे, मुंबई सातत्याने धावत – पळत असते आणि तिची गती तुम्हाला गाठायची असेल तर मुंबईसारखे धावले पाहिजे.
या मॅरेथॉन बद्दल मागील दोन दिवसापासून प्रचंड उत्सुकता असल्याने रात्री झोप येणे शक्यच नव्हते. मी भाग घेतलेली रन आठ वाजता होणार होती आणि त्यासाठी मैदानावर सात वाजता पोहोचायचे असले तरी पहाटे पाच वाजता सुरू होणारी 42 किलोमीटरची फुल मॅरेथॉन त्यानंतरची 21 किलोमीटरची हाफ मॅरेथॉन मला पहायची होती, त्यासाठी अगदी तीनला उठून कुडकुडत्या थंडीत चार वाजता मी मैदान गाठले…
चारही बाजूने रस्ते बंद असल्याने मैदानापर्यंत पोहोचवण्याचे काम राहुल या मित्राने केले!
अगदी पहाटेपासून संपूर्ण आझाद मैदान गर्दीने फुलून घेतले गेले होते. वेगवेगळ्या वयोगटातील स्त्री-पुरुष, दिव्यांग असतील किंवा वयोवृद्ध नागरिक असतील प्रचंड उत्साहाने या मैदानाकडे येत होती. या गर्दीचा उत्साह पाहूनच आपलाही उत्साह वाढत होता.
सर्व ठिकाणी अतिशय चोख नियोजन, जागोजागी मदत करणारे स्वयंसेवक यामुळे पहिल्यांदाच भाग घेऊनही इथे कोणतीच अडचण आली नाही.
एका मित्राचा प्रवेश पास माझ्याकडे अडकल्यामुळे आणि तो मित्र सीएसटी स्टेशनवर अडकल्याने सकाळीच मुख्य मॅरेथॉन चालू होण्याच्या आधीच आमचा सहा किलोमीटरचा वॉक पूर्ण झाला होता!
प्रचंड उत्साहात वेगवेगळे ग्रुपसमूह अनेक सामाजिक संदेश देत सहभागी झालेले पाहायला मिळाले. सात-आठ किलोमीटरचे अंतर इतक्या सगळ्या उत्साहात कधी पूर्ण झाले ते लक्षातही आले नाही!
तसा या आज असलेल्या मार्गावर माझा रोजच वॉक असतो मात्र आजचा माहोलच वेगळा होता.
पाहणाऱ्या प्रत्येकाला आपणही या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेच पाहिजे असे वाटावे इतका उत्साह होता.
आयुष्य हे भरभरून जगता आले पाहिजे…. आपल्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण करून घेतल्या पाहिजेत…. प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. असाच एक आनंद आणि एक स्वप्न आज या निमित्ताने पूर्ण झाले…
जवळपास पंधरा किलोमीटर वॉक होऊनही ना कुठला थकवा ना कुठली पाय दुखी…. फक्त आहे ते समाधान…..

#TataMumbaiMarethon
#MumbaiMarethon
#RunlikeMumbai
#DreamRun

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी