30 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeमुंबई'धनगड' की 'धनगर' समाज? 10 एप्रिलला होणार अंतिम सुनावणी

‘धनगड’ की ‘धनगर’ समाज? 10 एप्रिलला होणार अंतिम सुनावणी

महाराष्ट्रात राज्य सरकारने केलेल्या दाव्याप्रमाणे, एकाही व्यक्तीकडे धनगड असल्याचे जात प्रमाणपत्र नसल्याच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात प्रकाश टाकण्यात आला. राज्यात एक दोन नाही तर सुमारे 40 हजार 60 धनगड समाजाची लोकसंख्या असून जातपडाळणी कमिटीने काहीना जात प्रमाणपत्र दिल्याचा दावा धनगर समाजाच्य यचिकेला विरोध करणार्या याचिकाकर्त्यांनी केला. तसे पुरावेच न्यायालयात सादर केले. याची गंभीर दखल न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठोन घेतली. राज्यात धनगड समाज आहे की, नाही त्याबाबत 20 मार्च पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे निर्देश राज्य सरकारला देत याचिकेची अंतिम सुनावणी 10 एप्रिल पासून नियमित घेण्याचे निश्चित केले.

मुंबई उच्च न्यायालयात एस.टी. आरक्षणापासून वंचित असलेला समाज ‘धनगड’ की ‘धनगर’ आहे, यावर दि. 10 एप्रिलपासून सलग चार दिवस सुनावणी होणार असल्याची माहिती महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे महासचिव डॉ. जे. पी. बघेल व कायदेशीर सल्लागार मुरार पाचपोळ यांनी येथे दिली. काळेकर समितीने 1956 मध्ये दिलेल्या अहवालानुसार राज्यात ‘धनगड’ जातीचा उल्लेख निर्माण झाला आहे. एवढ्याच पुराव्याच्या आधारावर राज्यातील धनगर समाज आरक्षणापासून वंचित वास्तविकता आरक्षण देण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या देशातील एकाही संस्थेकडे ‘धनगड’ संवर्गातील घटक राज्यात वास्तव्यास असल्याचा पुरावा उपलब्ध नाही.

गेल्या दशकापासून यासंदर्भात पुरावे जमा करून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या याचिकेवर दि. 10 ते 13 एप्रिलदरम्यान सलग सुनावणी होणार असल्याची माहिती बघेल व पाचपोळ यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी मंचचे जिल्हाध्यक्ष प्रा. शामकांत वर्डीकर, राज्य संघटक चंद्रशेखर सोनवणे, सचिव सुधाकर शेळके, जिल्हा सचिव भिकनराव पेंढारकर यावेळी उपस्थित होते.

मंचने देशभरातन ‘आरटीआय’ कायद्याखाली माहिती उपलब्ध केली. त्या माहितीवरून राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर ओरान, धनगड जमातीचा उल्लेख आहे. मात्र ती जमात धनगड नसून धनगर आहे, यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. 2017 पासून दाखल याचिकेवर या महिन्यात अंतिम सुनावणी होणार असल्याने समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. धनगर समाजाच्या ST आरक्षणासाठी सुरु असलेल्या न्यायालयीन लढ्यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी दि. 2 रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा :  

धनगर समाजासाठी 1 हजार कोटींची तरतूद; निवडणूकांच्या तोंडावर अर्थसंकल्पातून खूश करण्याचा प्रयत्न

धनगर आरक्षणावर १६ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सुनावणी

महत्वाची बातमी : यापुढे नोकरभरतीत ट्रान्सजेंडरनाही आरक्षण; पोलीस दलातही ‘तिसरा पर्याय’

‘Dhangad’ or ‘Dhangar’ society?, Mumbai High Court

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी