33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमुंबईधारावी कमला नगरला भीषण आग; 20 हून अधिक घरे जळून खाक

धारावी कमला नगरला भीषण आग; 20 हून अधिक घरे जळून खाक

मुंबईतील कमला नगर येथील झोपडपट्टीत मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. सुदैवाने या घटनेत कुणी जखमी झाले नाही. मात्र, या आगीमुळे या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. (Dharavi’s Kamla Nagar)

मुंबईतील कमला नगर येथील झोपडपट्टीत मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. सुदैवाने या घटनेत कुणी जखमी झाले नाही. मात्र, या आगीत २५ पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झालाया आहेत. तब्बल तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.

Image

मुंबईत धारावी परिसरातील कमला नगरच्या झोपडपट्टीला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल २० ते २५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या या ठिकाणी फायर कुलिंगचं काम सुरू आहे. अशातच या आगीमुळे वाहुतीक बदल करण्यात आले आहेत.

Image

धारावी कमला नगर येथील आगीमुळे ९० फुट रोड बंद करण्यात आला असून वाहतूक संथ गतीनं रोहिदास मार्गाकडे वळवण्यात आली आहे. टी जंक्शनपासून ६० फीट रोडवर जाण्याऐवजी रहेजा माहीमकडे वाहतूक वळवण्यात आली आहे. या वाहतूक बदला संदर्भात मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने त्यांच्या ट्विटर हँडल वरून माहिती दिली आहे. यात धारावी परिसरातील आगीमुळे वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे म्हटले असून या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी याची दखल घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :  धारावी प्रकल्प हाती घेणे अदाणींचा अडाणीपणा ?

बीडीडी चाळींच्या परिसरातील पात्र झोपडीधारकांना ३०० स्केअर फुटांचा फ्लॅट मिळणार

Video : लालबागच्या अविघ्न पार्कला पुन्हा लागली आग

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी