सगळीकडे नावरात्रोत्सवाची धामधूम चालू असताना रविवारी, (22 ऑक्टोबर) डोंबिवलीत रक्तदान शिबिर आणि दिव्यांग बांधवाना मोफत जयपूर फूट वाटप या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, झी 24 तास आणि रत्न निधी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘मिशन – दिव्यांग मुक्त ठाणे जिल्हा’ ह्या उपक्रमांतर्गत वर्षभर ह्या कार्यक्रमातून सुमारे 10 हजार दिव्यांग बांधवाना मोफत जयपूर फूट, कृत्रिम हात अथवा कॅलीपर्स देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रक्तदान शिबिरामार्फतही शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या उपक्रमात 100 हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले तर 25 दिव्यांग बांधवांच्या हात आणि पायाचे माप घेण्यात आले. पुढील महिन्यात या दिव्यांग बांधवाना मोफत जयपूर फूट आणि कृत्रिम हाताचे वाटप करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार व कल्याण लोकसभा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झी – 24 तास , डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि रत्न निधी ट्रस्ट यांच्या सहकार्याने दिव्यांग बांधवांना मदत साहित्याचे विनामूल्य वाटप व रक्तदान शिबीराचे आयोजन डोंबिवली येथे करण्यात आले होते.
‘मिशन – दिव्यांग मुक्त ठाणे जिल्हा’ या उपक्रमा अंतर्गत ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी हे शिबीर पुढील वर्ष भर महिन्यातील प्रत्येक चौथ्या शनिवारी ठाणे शहरातील आनंद – आश्रम येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भरवण्यात येईल. तसेच, महिन्यातील प्रत्येक चौथ्या रविवारी डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू असणार आहे.
हे ही वाचा
‘कंत्राटी’वरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये ट्विटर वॉर!
अग्निवीर योजनेवरून रोहित पवार अन भाजपमध्ये जुंपली
जरांगे-पाटलांबाबत काय म्हणाले प्रकाश आंबेडकर….
यावेळी रत्न निधी ट्रस्टचे सर्वेसर्वा राजीव मेहता, श्वास ब्लड बँकचे जीवन सगरे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, उपशहर प्रमुख राजेश कदम, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख राम राऊत, सहकक्ष प्रमुख माऊली धुळगंडे तसेच सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.