32 C
Mumbai
Tuesday, May 16, 2023
घरमुंबईVIDEO : रेल्वे रुळांमध्ये आणि भोवती खडी का असते जाणून घ्यायचेय...

VIDEO : रेल्वे रुळांमध्ये आणि भोवती खडी का असते जाणून घ्यायचेय…

आपण नेहमी लोकलने प्रवास करताना रेल्वेच्या रुळांमध्ये आणि त्याच्या भोवताली खडी टाकलेली पाहात आलो आहोत. पण ही खाडी टाकण्यामागे नेमके कारण काय असेल? असा प्रश्न नेहमीच आपल्याला पडत असेल… चला तर मग त्यामागचे शास्त्रीय कारण जाणून घेऊ या…रुळांभोवती आणि त्याच्यामध्ये जी खडी टाकलेली असते त्याला track ballast (रुळांचा समतोल राखण्यासाठी टाकण्यात येणारी वाळू) असे म्हंटले जाते. ट्रेन ज्यावेळी रुळांवरून जाते त्यावेळी प्रचंड प्रमाणात कंपन (vibration) होत असते. त्यामुळे रूळ आपल्या जागेवरुन सरकू नयेत यासाठी ही खडी मदत करते. (Do you want to know why there is pebble in and around railway tracks…)

ट्रेनचे वजन किती असते याबाबत आपण सर्वजण जाणून आहोत. इतक्या प्रचंड वजनाचे रेल्वेचे डबे ज्यावेळी रुळांवरून धावतात त्यावेळी प्रचंड आवाज आणि कंपन होत असते. या कंपनांमुळे आणि आवाजामुळे भोवतालच्या इमारतींना तसेच वास्तूंना धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळी रुळांना घट्ट पकडून ठेवण्यासाठी आणि कंपनांची तीव्रता कमी करण्यासाठी या खडीची मदत होते. तसेच रेल्वे रुळांभोवती लहान रोपटी उगवतात ज्यामुळे जमिनीचे नुकसान होते. रुळांभोवती आणि मध्ये टाकण्यात येणाऱ्या खडीमुळे अशा प्रकारची रोपटी उगवण्यास अटकाव होतो.

या खडीमुळे रूळांखालची जमीन भुसभुशीत होत नाही, ती टणक राहाते. रुळांवर पाणी साचू न देण्यास ही खडी काही अंशी मदत करते. या खाडीमुळे रूळांवरील पाण्याचा निचरा होतो. तसेच रुळांभोवतीचे पाणी वाहून जाण्यासही मदत होते. रूळांखालच्या स्लिपर्सना या track ballast मुळे स्थिरता प्राप्त होते. ज्यावेळी एखादी ट्रेन रूळांवरून जात असते त्यावेळी track ballast आणि स्लीपर्स ट्रेनचे प्रचंड वजन पेलवून धरतात परिणामी अपघाताची शक्यता कमी होते.

अधिक माहितीसाठी हा VIDEO पाहा :

हे सुद्धा वाचा

VIDEO : रेणुका ठाकूरने मारलेल्या ‘त्या’ निशाण्यावर पाकिस्तानी खेळाडू घायाळ

VIDEO : अदानी गो बॅक, स्टॉप अदानी; हिंडेनबर्ग अहवालानंतर का व्हायरल होताहेत फोटो, व्हिडिओ, जाणून घ्या सत्य

महिंद्रा रॅली शानदार जानदार दमदार ऑफ रोड 4 बाय 4 ई-एसयूव्ही; हा कॉन्सेप्ट डिझाईन व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी