26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरमुंबईमुंबई महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांचा कामबंद आंदोलनाचा इशारा

मुंबई महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांचा कामबंद आंदोलनाचा इशारा

टीम लय भारी

मुंबई : मुंबई महानगरपालिका रुग्णालायात काम करणाऱ्या डॉक्टरांनी कामबंद आंदोलनाचा इशारा (Doctors of Mumbai Municipal Hospital strike warning) दिला आहे. १ ऑगस्टपासून मनपा रुग्णालयातील डॉक्टर (Doctors) कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने पदव्युत्तर पदवी उमेदवारांची बंधपत्रित सेवा प्रक्रिया थांबवल्याने आक्रमक झालेल्या डॉक्टरांनी अखेर बंधपत्रित उमेदवारांची केंद्रीय नियुक्ती सुरु करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

मुंबईमध्ये साथीचे आजार झपाट्याने वाढत आहेत. याचमुळे अनेक नागरिकांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे लागत आहेत. याचमुळे निवासी वैद्यकीय डॉक्टरांवर कामाचा व्याप वाढला आहे. पण अद्यापही प्रथम वर्षाची बॅच रुग्णालयात दाखल करण्यात आलेली नाही. तर केंद्रीय पद्धतीने सुद्धा बंधपत्रित उमेदवारांची संशोधन संचालनालयामार्फत नियुक्ती करण्यात आलेली नाही.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेतील रुग्णालयात वरिष्ठ निवासी अधिकारी आणि हाऊस ऑफिसर यांची नियुक्ती करून डॉक्टरांवरील कामाचा भार कमी करावा, अशी मागणी डॉक्टरांकडून करण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या कठीण काळात रुग्णांना सेवा देणाऱ्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना अद्यापही ऋण निर्देश भत्ता आणि अनुभव पत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात आरोग्य सेवा कोलमडू नये यासाठी डॉक्टरांच्या मागणीचा विचार करावा, अशी विनंती डॉक्टरांकडून वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :

अजय देवगणच्या ‘तानाजी’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर

६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

‘तो पुन्हा येईल’

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!