29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईमुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात नालेसफाईच्या नावावर फक्त हातसफाई!

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात नालेसफाईच्या नावावर फक्त हातसफाई!

पावसाळा तोंडावर आला असताना पालिकेतर्फे नालेसफाईची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात तर काही वेगळेच चित्र आहे. गतवर्षात कार्यादेश न काढता करून घेतलेल्या नालेसफाईच्या कामाची बिले अद्याप मिळाले नाही, पण नविन कामासाठी पालिकेने सफाई कर्मचाऱ्यांकडून कामाचा तगादा लावल्याने ठेकेदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाई ही दरवर्षी चर्चेचा विषय ठरत असून, गेली कित्येक वर्षे नालेसफाईच्या नावावर फक्त हातसफाई होत असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे.

स्मार्ट सिटी म्हणून ओळख मिळालेल्या ठाणे महापालिकेने यंदा नालेसफाईच्या कामाला जोरदार सुरुवात केलेली आहे. ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर हे शहरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा वेळोवेळी आढावा घेत असून, बुधवारी शहरातील सर्व ठेकेदारांची बोलवून एक बैठक घेतली. या बैठकीत बांगर यांनी नालेसफाईचे काम मे महिन्याच्या आत करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, मागील वर्षी कार्यादेश न काढता नालेसफाई केली. त्यांनतर त्या कामाची बिले अद्याप मिळालेली नाहीत. या वर्षीही अशाच प्रकारे नालेसफाई होत असल्याने ठेकेदारांनी नाराजी व्यक्त केली.

ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामाकरिता 2022-2023 या वर्षासाठी सुमारे 10 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. या कामाच्या अनुषंगाने निविदा काढण्यात आल्या होत्या, पण आजपर्यंत यासाठी कार्यादेश पारित करण्यात आलेला नाही. या कामासाठी कार्यादेश नसतानाही ठेकेदारांनी नालेसफाईची कामे केलीच कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यंदा नालेसफाई थोडी उशीर सुरू झाली असली तरी 31 मेपर्यंत ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने ठेकेदारांना दिल्या आहेत. त्यामुळे उसने पैसे घेऊन आम्ही करोडो रुपये खर्च करून ही कामे. करीत असून किमान मागील वर्षाची म्हणजेच 2022-23 या वर्षाची बिले लवकरात लवकर अदा करण्यात यावी, अशी मागणी ठेकेदारांनी केली आहे. या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही नाव न घेण्याच्या अटीवर ठेकेदारांनी सांगितले. ठाणे पालिका हद्दीत एकूण छोटे मोठे 315 जिल्हे आहेत. एकूण 9 प्रभाग समितीसाठी 9 ठेकेदारांना काम देण्यात आले आहे. यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने तब्बल 10 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे.

नालेसफाईच्या कामात निविदेमधील अटीनुसार नाल्यातून काढलेल्या गाळाचे मोजमाप, गाळांचे फोटो, नालेसफाईचे काम सुरू करण्यापूर्वीचे व काम सुरू असतानाचे फोटो, व्हिडीओ रेकॉर्डिंग, गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची माहिती, नालेसफाई करणाऱ्या कामगारांची यादी, कामगारांना पुरविण्यात येणाच्या सुविधांची माहिती ठेकेदारांनी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे सुपूर्द केली आहे. पण मागील वर्षाचे बिले अदा करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हे सुद्धा वाचा :

सत्तासंघर्षात तूर्तास शिंदे सेनेला जीवदान; ठाकरेंच्या या चुकीमुळे सरकार वाचलं!

राजकीय भूकंप: जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

घोटाळे करण्याचा कार्यक्रम मी कधीच..; ईडीच्या नोटिशीवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

Drain cleaning scam in Thane

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी