28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमुंबईनेपाळसह दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणात भूकंपाचे धक्के; 5.2 रिश्टर तीव्रता

नेपाळसह दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणात भूकंपाचे धक्के; 5.2 रिश्टर तीव्रता

अनेकदा नेपाळमधील भूकंपाच्या तीव्रतेमुळे भारताची भूमीही हादरते. शेजारील हिमालयीन देश नेपाळमध्ये २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १.४५ वाजता बाजुरा येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता ५.२ इतकी होती. यामुळे दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांना देखील भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. आतापर्यंत जीवित वा वित्तहानी झाल्याची बातमी नाही. पण ज्या प्रकारे एवढ्या तीव्रतेने जमीन हादरली, त्यामुळे नागरीकांची चांगलीच झोप उडाली आहे. (Earthquake tremors in Nepal affected Delhi, Uttar Pradesh, Haryana)

नेपाळमधील बाजुरा भागात बुधवारी (२२ फेब्रुवारी) दुपारी १.४५ च्या सुमारास ५.२ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के उत्तराखंड, दिल्ली एनसीआर आणि उत्तर प्रदेशातील काही भागांना देखील बसले आहेत, अशी माहिती येथील राष्ट्रीय भूकंप निरीक्षण आणि संशोधन केंद्राने दिली आहे. त्याचे केंद्र नेपाळमधील जुमलापासून ६९ किमी अंतरावर १० किमी अंतरावर असल्याचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले आहे.

उत्तराखंडमधील फितोरगढच्या १४३ किमी पूर्वेला, १० किमी खोलीवर केंद्रबिंदू असलेल्या ठिकाणी सुद्धा भूकंपाचे धक्के बसले आहे. बुधवारी (दि. २२) दुपारी १.४५ च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के बसले असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने दिली आहे.

नेपाळमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वारंवार भूकंप होत आहेत. यापूर्वी २४ जानेवारी रोजी नेपाळमध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप झाला होता. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये, नेपाळमध्ये ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला होता. दरम्यान डोटी जिल्ह्यात घर कोसळून झालेल्या घटनेत किमान सहा जणांचा मृत्यू झाला. या भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआर भागातही जाणवले होते.

हे सुद्धा वाचा : ‘हे’ आहेत जगातील आतापर्यंतचे १० शक्तिशाली भूकंप

तुर्की, सिरीयातील शक्तीशाली भूकंपात आतापर्यंत २३०० लोकांचा मृत्यू

भुसावळमध्ये भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी