मुंबई

Mumbai Accident News : ओला चालकाने वाहनांना दिलेल्या धडकेत आठ जण जखमी

मुंबईतील घाटकोपर येथे आज (ता. 21 सप्टेंबर) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. एका ओला चालकाने तीन रिक्षा, एक टेम्पो आणि आणि दोन दुचाकी वाहनांना धडक दिली. या अपघातात एकूण आठ जण जखमी झाली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातातील जखमींमध्ये तीन विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. घाटकोपरच्या सुधा पार्क परिसरात दुपारी एकच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेनंतर या अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर अपघाताची घाटकोपर पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे. राजू यादव असे या ओला चालकाचे नाव असून हा चालक घाटकोपरमधील कामराज नगर येथे राहणारा आहे.

आज दुपारी एकच्या सुमारास घाटकोपरमधील सुद्धा पार्क या ठिकाणी हा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये आठ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राजू यादव हे ओला घेऊन सुधा पार्क परिसरातून जात होते. याचवेळी त्यांच्या चारचाकी वाहनाने अचानक वेग घेतला. त्यानंतर या वाहनाने रस्त्यात असलेल्या वाहनांना उडवत हायवे गाठला. दुपारची शाळेची वेळ असल्याने या रस्त्यावर काही विद्यार्थी देखील होते.

दरम्यान, यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या वाहनाची धडक बसली. ज्यामुळे हे विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ओला या अपघातात रिक्षा, टेम्पो आणि दुचाकींचे देखील नुकसान झाले आहे. परिणामी या घटनेनंतर पोलिसांनी लगेच घटना घडलेल्या ठिकाणी धाव घेतली आणि ओला चालक राजू यादव याला ताब्यात देखील घेतले.

हे सुद्धा वाचा

Aaditya Thackeray : शिंदे सरकार महाराष्ट्रातील रोजगार पळवतेय; आदित्य ठाकरेंचा आरोप

School Bus Fire : तरुणांच्या प्रसंगावधानाने वाचले 20 चिमुकल्यांचे प्राण

Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यातून तेजस ठाकरेंची राजकारणात एंट्री

दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला ? याबाबत अद्यापही पूर्ण माहिती मिळू शकलेली नाही. ओला चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला की गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडला. किंवा वाहन चालक गाडी चालवताना नशेत होता की अजून कोणत्या कारणामुळे हा अपघात घडला याबाबतच अद्यापही काहीही स्पष्ट झालेले नाही. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातातील जखमींच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. परंतु घाटकोपरमध्ये घडलेल्या या भीषण अपघातामुळे लोकांमध्ये खळबळ उडालेली पाहायला मिळाली.

पूनम खडताळे

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

21 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

21 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

22 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

22 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

23 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 day ago