27 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमुंबईEknath Shinde Cabinet Expansion : सुप्रिया सुळे म्हणाल्या, संजय राठोडांना मंत्रीपद मिळाल्याचा...

Eknath Shinde Cabinet Expansion : सुप्रिया सुळे म्हणाल्या, संजय राठोडांना मंत्रीपद मिळाल्याचा मनापासून आनंद

संजय राठोड हे निर्दोष होते. त्यांना आता मंत्रीपद मिळाले याचा मला मनापासून आनंद झाला असल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचा काहीही संबंध नव्हता. आम्ही हे पहिल्यापासून सांगत होतो. परंतु भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर बेफामपणे आरोप केले. संजय राठोड हे निर्दोष होते. त्यांना आता मंत्रीपद (Eknath Shinde Cabinet Expansion) मिळाले याचा मला मनापासून आनंद झाला असल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. भाजपनेच बेफाम आरोप करून संजय राठोड यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. राठोड यांचा काहीही दोष नाही,असे आम्हीही तेव्हाही सांगत होतो, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.भाजप हा नेहमीच खोटेनाटे आरोप करीत असतो. संजय राठोड यांच्यावर भाजपने केलेल्या आरोपांमुळे त्यांच्या कुटुंबियांना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागले असेल, त्यांच्यावर काय प्रसंग उद्भवला असेल याचाही विचार करायला हवा.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde cabinet Expansion : मंत्रिमंडळातून नितेश राणेंचा पत्ता कट, पण दीपक केसरकरांना संधी

Eknath Shinde cabinet Expansion : वादग्रस्त अब्दुल सत्तार, संजय राठोड यांनाही मिळाली मंत्रीपदाची खूर्ची

एकनाथ शिंदे गटाची तातडीची बैठक,  मंत्रीमंडळ विस्ताराअगोदर नाराजीचा घोळ !

अशा खोट्या आरोपांमुळे एखादे कुटुंब उद्धवस्त होवू शकते. पण स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी भाजपचे नेते खालच्या पातळीवर जातात, अशी टीकाही सुळे यांनी चित्रा वाघ यांचे नाव न घेता केली.
डॉ. विजयकुमार गावीत यांच्यावर सुद्धा भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आता ते मंत्री झाले आहेत. गावीत माझ्या कुटुंबातील माणूस आहे. आम्ही एका कुटुंबात राहिलेलो आहोत. एका ताटात जेवलो आहोत. आमचा माणूस मंत्री झाला, याचा मला फार मोठा आनंद झाला असल्याचीही प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी