31 C
Mumbai
Friday, May 5, 2023
घरमुंबईज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी आजारी असल्याचे समजताच एकनाथ शिंदे आले धावून

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी आजारी असल्याचे समजताच एकनाथ शिंदे आले धावून

पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषणने सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर या सध्या आजारी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुलोचनादीदी आजारी असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी तातडीने त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. तसेच त्यांना उपचारासाठी देखील तातडीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून रुग्णालयाला तीन लाख रुपयांची आर्थिक मदत देखील केली. शिेंदे यांनी यासंदर्भात प्रशासनाला तशा सुचना देखील केल्या होत्या. (Eknath Shinde Financial help for the treatment of senior actress Sulochanadidi)

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी या ९४ वर्षांच्या आहेत. त्यांना श्वसनासंबंधी संसर्ग झाल्यामुळे दादर येथी शुश्रुषा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुलोचनादीदी आजारी असल्याची माहिती मिळतात त्यांनी त्यांच्या तब्बेतीची तातडीने चौकशी केली. शिंदे यांनी सुलोचनादीदी यांच्या परिवारासोबत चर्चा केली तसेच सुलोचनादीदी यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायतानिधीतून उपचारासाठी आर्थिक मदत देण्याच्या सुचना देखील केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार सुलोचनादीदी यांच्यावरील उचरासाठी रुग्णालयाला तीन लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांनी दिले स्पष्टीकरण; नागालँडमध्ये भाजपला नव्हे तर मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

संसदेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी; पार्लमेंट ऑफ इंडिया भरती २०२३ अंतर्गत संसदीय दुभाषी पदासाठी १३ जागांची भरती

सत्ताधारी आमदार, खासदारांच्या घरासमोर फेकणार कांदा; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी जवळपास अडीचशेहून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. सन २००९ साली त्यांना राज्य सरकारने महाऱाष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे. तसेच केंद्र सरकारने २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी