29 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमुंबईEknath Shinde : एकनाथ शिंदे गोरगरीबांचे कैवारी वाटतात का ? जाणून घ्या...

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोरगरीबांचे कैवारी वाटतात का ? जाणून घ्या सामान्य लोकांच्या इरसाल प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांच्याविषयी अशा पद्धतीच्या एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया ‘लय भारी’च्या फेसबुक पेजवर आल्या आहेत. काही मोजक्या प्रतिक्रिया शिंदे यांच्या समर्थनार्थ सुद्धा आल्या आहेत. पण अशा प्रतिक्रियांचे प्रमाण फारच कमी आहे.

एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत समझौता करून राज्यात सत्तापालट केला. मुख्यमंत्री हे राज्यातील सर्वोच्च पद त्यांनी मिळविले. ‘अनाथांचा नाथ, एकनाथ’ या टॅगलाईनखाली जनतेची सहानुभूती मिळविण्याचाही प्रयत्न शिंदे व त्यांच्या समर्थकांनी चालवला आहे. पण एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेला कसलेही कौतुक नाही. एकनाथ शिंदे यांच्याप्रती जनतेच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. ‘एकनाथ शिंदे हे गोरगरीबांचे कैवारी वाटतात का ?’ अशी पोस्ट ‘लय भारी’ने फेसबुक पेजवर टाकली होती. त्यावर अवघ्या दोन दिवसांत तब्बल अडिच हजार प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. एकनाथ शिंदे यांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढणाऱ्या प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या आहेत.

उद्धव ठाकरे हेच जनतेचे कैवारी वाटतात, अशा उस्फूर्त प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या आहेत. तटस्थपणे प्राप्त झालेल्या या प्रतिक्रिया म्हणजे ही लिटमस टेस्ट आहे. विजय पार्टे यांनी ‘सगळ्यात मोठा महाराष्ट्रद्रोही’ अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांची संभावना केली आहे. भाऊसाहेब शिंदे यांनी शिंदे यांच्याबद्दल ‘चोरांचे कैवारी आहेत. कारण ५० जणांना ५० खोके देवून त्यांना ईडीपासून वाचवले’ असे मत व्यक्त केले आहे. विलास गव्हाणे नावाच्या नेटकऱ्याची प्रतिक्रिया तर पारच मजेशीर आहे. शिंदे ‘हे फक्त भाजपच्या हंटरवर नाचणारे वाघ आहेत’ अशी अतियश टोकदार प्रतिक्रिया मांडली आहे. नाथा गवारे यांनी ‘तो खोक्याचा कैवारी गद्दार आहे’ असे नमूद केले आहे.

https://www.facebook.com/105738254314361/posts/pfbid02tdYjYtBTuHg66RQbjjs8hVnkHb1Cw15ZVE12VNXBzcsByHFw6ovPx8sumwQrRJMdl/

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोरगरीबांचे कैवारी वाटतात का ? जाणून घ्या सामान्य लोकांच्या इरसाल प्रतिक्रिया

हे सुद्धा वाचा…

Eknath Shinde : एकनाथ शिंदे सत्तेत आले अन् राज्याचे 3 हजार कोटींचे नुकसान झाले !

Arvind Kejriwal : …तर गुजरातमध्ये ‘आप’ची सत्ता येणार, केजरीवाल यांचा दावा

अमित शाह मुंबईत येणार; गणेशोत्सवाच्या खांदयावरून पालिकेच्या निवडणुकीची पेरणी करणार

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोरगरीबांचे कैवारी वाटतात का ? जाणून घ्या सामान्य लोकांच्या इरसाल प्रतिक्रिया

परमेश्वर पाटील यांनी ‘एकनाथ शिंदे हे गोरगरीबांचे कैवारी वाटत नाही. कारण ज्या थाटीत खाल्लं त्या थाटीला लाथ मारून किंवा गद्दारी करून बाहेर पडला. तो गोरगरीबांचा काय होणार. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा उद्धव ठाकरेंना शोभा देतोय. जय महाराष्ट्र’ अशी भावना व्यक्त केली आहे. अनिल जाधव नावाच्या नेटकऱ्याने तिरसट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘एकनाथ शिंदे यांनी गोरगरीब लोकांसाठी काय कामे केली हे ठाणेकर जनता सांगू शकेल. चमच्यांनी गरीबांसाठी केलेली कामे विस्तृतपणे जनतेला पटवून द्यावीत. एकनाथ शिंदे यांना गरीबांचा कैवारी म्हणून आंतरराष्ट्रीय पुरस्कार द्यावा म्हणजे त्यांनी केलेली गद्दारी झाकून जाईल’ अशा शब्दांत शिंदे व त्यांच्या समर्थकांची जाधव यांनी खिलल्ली उडविली आहे.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोरगरीबांचे कैवारी वाटतात का ? जाणून घ्या सामान्य लोकांच्या इरसाल प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांच्याविषयी अशा पद्धतीच्या एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया ‘लय भारी’च्या फेसबुक पेजवर आल्या आहेत. काही मोजक्या प्रतिक्रिया शिंदे यांच्या समर्थनार्थ सुद्धा आल्या आहेत. पण अशा प्रतिक्रियांचे प्रमाण फारच कमी आहे.
अशा प्रतिक्रियांचा अंदाज घेतला तर एकनाथ शिंदे यांच्याविषयी तळागाळातील लोकांमध्ये चांगल्या भावना नाहीत, असेच दिसत आहे. शिंदे यांनी मोदी – शाह यांचे मन जिंकले असेल तरी ते जनतेच्या मनातून उतरल्याचे या प्रतिक्रियांवरून दिसत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी