26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरमहाराष्ट्रबंडखोरी करुनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतले बाळासाहेबांचे दर्शन

बंडखोरी करुनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतले बाळासाहेबांचे दर्शन

टीम लय भारी

मुंबईः शिवसेनेशी बंडखोरी करुनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. गुरुपौर्णिमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. त्यांनी नतमस्तक होत बाळासाहेब ठाकरेंचे दर्शन घेतले.

या वेळी ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंचे मला आशिर्वाद आहेत. त्यांच्या आशिर्वादाने या घडामोडी शक्य झाल्या. त्यांनी जो विचार दिला तो विचार पुढे नेण्याचा मी आणि सोबतचे 50 आमदार प्रयत्न करत आहोत. सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम आमचे सरकार करणार आहे. राज्याचा विकास हेच आमचे धेय्य आहे. आज त्यांचे आशिर्वाद घेतले आहेत. ते आमच्या पाठीशी आहेत. धर्मवीर आनंद दिघे आमचे गुरु आहेत. हजारो शिवसैनिक त्यांना वंदन करत असतात.

राज्यात दहा दिवसांपासून पाऊस सुरु आहे. राज्यातील अनेक जिल्हयात पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाऊस सुरु असलेल्या जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांशी संपर्क केला असून, आवश्यक ती मदत करण्याचे आव्हान केल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. रात्री देखील मुख्य सचिवांशी बोलणं झाले. राज्याची सर्व यंत्रणा अलर्ट आहे. दुर्घना घडू नये असे प्रयत्न आहेत. एनडीआरएफ यंत्रणा सज्ज आहे. ज्यांचे स्थलांतर केले आहे. त्यांची चांगली व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहे असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हे सुध्दा वाचा:

‘सुशांत सिंह’ मृत्यू प्रकरणी ‘रिया’ला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा

महाराष्ट्र भाजपचा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप

बंडोबांचे सत्र संपेना! शितल म्हात्रे शिंदे गटात सामील

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!