31 C
Mumbai
Wednesday, August 30, 2023
घरमुंबईएकनाथ शिंदेंच्या होम ग्राउंडमधील प्रकार; ठाण्यात परिचारिका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना चक्क जमिनीवर...

एकनाथ शिंदेंच्या होम ग्राउंडमधील प्रकार; ठाण्यात परिचारिका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना चक्क जमिनीवर बसवले!

एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या ठाणे गडातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या २२ रुग्णांचा हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीने बळी गेला होता. त्यामुळे ठाण्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळेच महापालिकेने तातडीने मंगळवार परिचारिका भरती प्रक्रिया सुरू केली. ठाण्यात परिचारिका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना चक्क जमिनीवर बसवले. ठाणे महापालिका जेव्हा विविध कार्यक्रम आयोजित करते तेव्हा पाहुण्यांना रॉयल ट्रीटमेंट देण्यात येते. असे असताना परिचारिका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना चक्क जमिनीवर बसवून ठाणे महापालिकेने ‘गतिमान, वेगवान ‘ सरकारची लाज काढली अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.

ठाणे महानगरपालिका भवनात परिचारिका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना चक्क जमिनीवर बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे यात काही अपवाद वगळता सर्वच उमेदवार या महिलाच होत्या.
ठाणे महापालिकेतर्फे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात परिचारिका पदासाठी 72 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या. या 72 पदांसाठी राज्यभरातून जवळपास 500 हुन जास्त उमेदवार आल्याने त्यांची व्यवस्था करायची कुठे असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला. त्यामुळे त्यातील काही उमेदवारांना चक्क पहिल्या माळ्यावर असणाऱ्या लॉनच्या आणि महापौर कार्यालयाच्या लॉबीतच त्यांना जमिनीवरच बसवण्यात आले.

मुलाखतीचा नंबर आल्यावर तिसऱ्या मजल्यावर त्यांना पाठवण्यात येत असे. हा प्रकार लक्षात आल्यावर तसेच माध्यमांनी याबाबत प्रशासनाला विचारणा केल्यावर तात्काळ या सर्व उमेदवारांना पालिकेच्या सभागृहात बसवण्यात आलं. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेत पालिकेच्या उपायुक्त कार्यालयात धडक देत पालिकेला यबाबत जाब विचारला. इतकी गर्दी येणार याची माहिती असूनही पालिकेने योग्य व्यवस्था केली नाही. जर रम गणेश गडकरी नाट्यगृह अथवा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात मुलाखती घेतल्या असत्या तर हे टाळता आले असते असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने  म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा
रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीने वाचवला भावाचा जीव; नवी मुंबईत अनोख्या पद्धतीचे रक्षाबंधन!
धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांची रक्षाबंधन ठरणार आगळी -वेगळी!
काका विरोधात बंडानंतर राजकीय आश्रय देणाऱ्यालाच धनंजय मुंडे विसरले!

आम्ही आलेल्या सर्व उमेदवारांची योग्य ती काळजी घेतली असून त्यांना सकाळी सभागृहातच बसवण्यात आल होतं मात्र गणपती उत्सवासंदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याने फक्त काही काळासाठी त्यांना बाहेर बसवण्यात आल होते. त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय झाली नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. ठाणे महापालिका जेव्हा विविध कार्यक्रम आयोजित करते तेव्हा पाहुण्यांना रॉयल ट्रीटमेंट देण्यात येते. असे असताना परिचारिका भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना चक्क जमिनीवर बसवून ठाणे महापालिकेने ‘गतिमान, वेगवान ‘ सरकारची लाज काढली अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी