32 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमुंबईMaharashtra Assembly Sesssion : एकनाथ शिंदे यांची खेळी, विधिमंडळ सभागृहात बाळासाहेब ठाकरेंचे...

Maharashtra Assembly Sesssion : एकनाथ शिंदे यांची खेळी, विधिमंडळ सभागृहात बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र !

मुख्यमंत्री आणि विधानसभा सभागृह नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून विधिमंडळ सभागृहात हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याबाबतचे पत्र विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांना देण्यात आले आहे.

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा (ता. 25 ऑगस्ट) अखेरचा दिवस होता. आजच्या दिवशी सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडून अनेक महत्वपूर्ण ठराव सभागृहात मांडण्यात आले. कालच्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या राड्यानंतर तर राज्याच्या राजकारणातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी लाजिरवाणी घटना घडली. पण या पावसाळी अधिवेशनात मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खूप मोठी खेळी खेळण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि विधानसभा सभागृह नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून विधिमंडळ सभागृहात हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याबाबतचे पत्र विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांना देण्यात आले आहे. या पत्रात करण्यात आलेल्या मागणीला अॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडून देखील मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना याच्या माध्यमातून भावनिक साद घातल्याचे जाणवू लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायमच आपणच खरे आणि कट्टर शिवसैनिक आहोत, असे वारंवार आपल्या बोलण्यातून सांगत असतात. शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हात मिळवीत राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन केले. पण त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना ‘बंडखोर’ आणि ‘गद्दार’ असे बोलून वारंवार डिवचण्यात आले. पण आता एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांकडून देखील आम्ही गद्दार नाही, आम्ही आजही शिवसेनेत आहोत, असे बोलण्यात येत आहेत.

आम्हीच खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, हे पटवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेचे सभागृह नेते अॅड. राहुल नार्वेकर यांना पत्र देत विधिमंडळाच्या सभागृहात हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

या मागणीला मान्यता देत विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी पुढील तीन महिन्यात विधिमंडळाच्या सभागृहात  स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी घोषणा विधानसभेत करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करत खेळी खेळण्याचे काम केले आहे.

हे सुद्धा वाचा

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी भाजपची नवी खेळी

Maharashtra Assembly Session : गद्दारी केलेल्यांनी राजीनामा द्यावा : आदित्य ठाकरे

Maharashtra Monsoon Session 2022 : शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले झाले आक्रमक

दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या खेळीमुळे उद्धव ठाकरे हे त्यांना काय उत्तर देतात ? हे पाहावे लागणार आहे. कारण याआधीच उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न वापरता स्वतःच्या बापाचे नाव वापरा, असा इशारा दिलेला होता. पण तरी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याला कानाडोळा करत थेट विधिमंडळाच्या सभागृहातच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याची मागणी केली आणि पुढील महिन्यात ही मागणी आता पूर्ण देखील करण्यात येणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी