31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबई​​Raj Bhavan : राजभवनचा निळाशार समुद्र, अभिनेता जॉकी श्रॉफ सुद्धा भारावला

​​Raj Bhavan : राजभवनचा निळाशार समुद्र, अभिनेता जॉकी श्रॉफ सुद्धा भारावला

महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सरकारी घर म्हणजे 'राजभवन'. राजभवन हे मुंबईतील सुंदर आशा निळयाशार समुद्र‍ किनाऱ्यावर वसलेली सुंदर वास्तु आहे. कोणालाही भुरळ पडावी अशी ही जागा. सुंदर अशा हिरवाईने नटलेली आहे. या जागेमध्ये सहसा कोणालाही प्रवेश करता येत नाही. कारण हे राज्यपालांचे निवासस्थान आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सरकारी घर म्हणजे ‘राजभवन’. राजभवन ​​(Raj Bhavan) हे मुंबईतील सुंदर आशा निळयाशार समुद्र‍ किनाऱ्यावर वसलेली सुंदर वास्तु आहे. कोणालाही भुरळ पडावी अशी ही जागा. सुंदर अशा हिरवाईने नटलेली आहे. या जागेमध्ये सहसा कोणालाही प्रवेश करता येत नाही. कारण हे राज्यपालांचे निवासस्थान आहे. त्यामुळे जे कोणी या ठिकाणी जाऊन आले आहेत, ते स्वत:ला भाग्यवान समजतात. सुप्रसिद्ध अभ‍िनेता जॉकी श्रॉफ यांनी देखील त्यांच्या राजभवनच्या आठवणी सांगितल्या आहेत. ‘राजभवनचा समुद्र किनारा’ या माहितीपटात महाराष्ट्राच्या राजभवनाचा तसेच तेथील समुद्र किनाऱ्याचा संक्ष‍िप्त इतिहास कथन केला आहे. छायाचित्रण तसेच मुलाखत रुपाने मांडला आहे.

ज्येष्ठ अभ‍िनेते जॅकी श्रॉफ देखील या निळयाशार समुद्र किनाऱ्यावर अनेकदा येऊन गेले आहेत अशी माहिती यामध्ये आहे. या माहिती पटामध्ये नाटय क्षेत्रातील भरत दाभोळकर यांनी आपल्या आठवणी सांगितल्या आहेत. तसेच राजभवनातील माजी अधिकाऱ्यांनी देखील आपल्या आठवणी सांगितल्या आहेत. राजभवनाच्या जनसंपर्क शाखेने हा माहितीपट तयार केला आहे. अभ‍िनेते जॅकी श्रॉफ आपल्या आठवणी सांगतांना म्हणतात की, मी याच परिसरात वाळकेश्वरला चाळीमध्ये राहत होतो. त्यावेळी लहानपणी समुद्रावर यायचो.

त्यावेळी राजभवन ही गोष्ट माझ्यासाठी खूपच मोठी होती. या ठिकाणी कोणालाही सहसा प्रवेश मिळत नव्हता. माझा मित्र विलास मोरे याच्यामुळे मी कितीतरी वेळा या ठिकाणी आलो आहे. तो याच ठिकाणी सरकारी कार्यालयात कामाला आहे. त्या मित्रामुळे राजभवन वारंवार पाहता आला. या ठिकाणी मला अनेक वेळा कॉफी प्यायला बोलावण्यात आले. जेव्हा मी लहानपणी या ठिकाणी येत होतो त्यावेळी रस्ता क्रॉस करतांना पोलिस आम्हाला पकडायचे आणि दांडयाने मारायचे. मग आम्ही त्यांना सांगायचो आम्ही इथलीच पोरं आहोत. मग आम्ही धूम ठोकायचो.

राजभवनाचे एक वैशिष्ठय आहे. राजभवनाला स्वत:चा असा एक समुद्र किनार लाभला आहे. राजभवनच्या पुर्व दिशेला 300 मीटर लांब, 100 मीटर रुंद समुद्र किनारा आहे. इ.स.1710 मध्ये हा परिसर शिकारीसाठी वापरत होते. 1788 ला मलबार हिलचा हा परिसर ब्रिटीश गर्व्हनरचे उन्हाळी सुटीचे निवास्थान होते. अनेक ब्रिटीश गर्व्हनर 1947 पर्यंत या ठिकाणी राहिले. त्यानंतर 1960 पासून हिच जागा महाराष्ट्राच्या सर्व राज्यपालांची निवास्थाने झाली

हे सुद्धा वाचा

Mantralaya News : बाळासाहेब पाटलांच्या खासगी सचिवांना जायचंय अतुल सावेंकडे !

Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसला कोर्टाकडून दिलासा नाहीच

Ramraje Naik Nimbalkar : जयकुमार गोरे यांच्यामुळे माणमधील औद्योगिक कॉरिडॉर कोरेगावला स्थलांतरीत झाला, रामराजे नाईक निंबाळकर यांचा गंभीर आरोप

1948 च्या आसपास मुलं या ठिकाणी वाळूमध्ये खेळण्यासाठी येत. अनेक जण पोहोण्यासाठी तर काही जण बोटींगसाठी या ठिकाणी येत. अनेक व्हीआयपी मंडळी या ठिकाणी येत. वेगवेगळया देशांमधील राजदूत, कंपन्यांचे अधिकारी, सीईओ या ठिकाणी येत. शाळेच्या सहली देखील या ठिकाणी येत.

अनेक जण राजभवनच्या किनाऱ्यावरुन नरिमन पाँईंटपर्यंत पोहोत जात. या परिसरात राहणारे अधिकारी राजभवनच्या किनाऱ्यावर गणपतींचे विसर्जन करण्यासाठी येतात. तर अनेक नेत्यांनी आपल्या गणपतींचे विसर्जन या ठिकाणी केले आहे. त्यामध्ये सुशिल कुमार शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश आहे. हा परिसर कोकणा इतकाच सुंदर आहे. नारळाच्या बागांनी वेढलेला हा परिसर खुपच आनंददायी आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी