28 C
Mumbai
Wednesday, September 6, 2023
घरमुंबईमोठ्या आकाराच्या गणेशमुर्तींना यंदा मागणी; वाचा काय आहे कारण?

मोठ्या आकाराच्या गणेशमुर्तींना यंदा मागणी; वाचा काय आहे कारण?

गणेशोत्सव जवळ आला असून आठवड्याभरापासून बाजारात गणपतीच्या आगमनासाठी आवश्यक वस्तूंची आयात सुरू झाली आहे. रक्षाबंधनाचा सण आटोपताच बऱ्याच दुकानात आता गणपती सजावटीचे सामान वीकेंडला भरले गेले. गणपतीच्या मुकुटापासून ते खाद्यपदार्थांची उपकरणे बाजारात विक्रीसाठी आता उपलब्ध झाली आहेत.

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. देशभरात गणपती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दक्षिण भारतातही गणपती उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. गणपतीची मूर्ती विकणारी स्टॉल जून महिन्यांपासूनच दिसून येत होते. फॅक्टरीतून गणपती मूर्ती आणल्यानंतर बाजारातील दर्शनीय ठिकाणी स्टॉल उभारणी करून आम्ही मूर्तींच्या जाहिरातीला सुरुवात करतो, असे कुर्ला येथील गणपती विक्रेते सांगतात. दोन वर्षाच्या कोरोनाच्या सावटीनंतर आता गणपतीच्या मोठ्या मूर्तींना मागणी वाढू लागली आहे.

दोन वर्षातील आर्थिक फाटक्यामुळे बऱ्याच मूर्तिकारांनी मध्यम आकाराच्या मूर्ती फॅक्टरीतून मागवल्या होत्या. आता लोकांनी पूर्वीप्रमाणेच घरगुती गणपतीसाठी नेहमीच्या आकाराच्या गणपती मूर्तींना पसंती द्यायला सुरुवात केलीये. गणेश भक्तांनी वेळीच कल्पना दिल्याने आम्ही आर्थिक नुकसानीतून वाचलो, अशी माहिती मूर्तिकारांनी दिली.

हे सुद्धा वाचा 
सनी देओल-अमिषा पटेलच्या आयुष्यात भाग्योदय; गदर 2 ची 500 कोटींची कमाई
जिनिलिया देशमुखचे मन मुलांसाठी होतयं कासावीस
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मृणाल गांजळेंचे मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेलांनी केले होते कौतुक

गणपतीच्या मूर्तीचा आकार तसेच रंगरंगोटी याबद्दल कल्पना यावी, त्याकरिता दोन महिने अगोदरच गणपतीसाठी स्टॉल लावणे गरजेचे असते. मागणी तसा पुरवठा हे सूत्र गणपती मूर्ती विक्रीसाठी अगोदरच पाळावे लागते. काही मूर्ती फॅक्टरी परत पाठवल्या गेल्या तर काही पुढच्या वर्षीसाठी बांधून ठेवण्यात आल्या आहेत. सदर रंगरंगोटीच्या कामात आम्ही व्यस्त आहोत, असेही मूर्तिकार म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी