31 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरमुंबईकोरोना काळात नोकरी गेली, उपासमारीची वेळ आली; पण बाप्पाने चिंता मिटवली

कोरोना काळात नोकरी गेली, उपासमारीची वेळ आली; पण बाप्पाने चिंता मिटवली

कोरोना काळातील दोन वर्षात भारतीय बाजारपेठेत कमालीची घसरण झाली. अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. या आर्थिक संकटातून मला बाप्पानंच वाचवलं. एका रात्री कंपनीतील अधिकाऱ्यांचा फोन आला. फोनमधील संवादातून मला नोकरीची शाश्वती नसल्याची कल्पना आली. दुसऱ्या दिवशी कामाला तातडीने बोलावून घेण्यात आलं. काही समजण्याच्या आतच आमच्याकडून राजीनामा घेतला गेला. अशा कठीण प्रसंगी मी बाप्पाची आठवण काढली. गणपती बाप्पा मोरया म्हणत मी गणपती मूर्ती विक्रीचा व्यवसाय सुरू केला. तीन वर्षात कुटुंब आर्थिक संकटातून तरलं, या शब्दात मुंबईत गेल्या तीन वर्षापासून गणपती मूर्ती विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका विक्रेत्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या.

मी मूळचा पेणचा. त्यामुळे गणपती मूर्ती व्यवसायाशी माझा निकटचा संबंध आहे. आमच्या घरी प्रामुख्याने शाळेच्या मूर्ती बनवल्या जातात. मूर्तींवर रंगरंगोटीचं कामही गावीच होतं. पण याकडे व्यवसाय म्हणून कधीच पाहिलं नाही. मी एका नामांकित कंपनीत अन्न दर्जा व्यवस्थापक होतो. मुंबईबाहेर सततचा प्रवास असायचा. कंपनीतील वरिष्ठांनी अचानक एका रात्रीत मला कामावरून काढण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे मनुष्यबळ कमी करण्यात आल्याची सबब मला दिली गेली. हातात दुसरी नोकरीही नव्हती. मुलीचं शिक्षण बाकी होतं, असं सांगत ते दिवस पुन्हा आठवताना विक्रेत्यानं आवंढा गिळला. मी घरातल्यांशी चर्चा केली, घरच्यांनी मला गावातल्या व्यवसाय शहरात आणण्याचं सुचवलं. पहिल्याच वर्षी नवा व्यवसाय यशस्वी ठरला, असं सांगताच मूर्तिकराच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं.

हे सुद्धा वाचा 
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; पुसेसावळीत जाळपोळ, दंगल
११ सप्टेंबरच्या ‘त्या’ आठवणीने अमेरिकन नागरिकांच्या मनात आजही थरकाप उडतो
ठाणे बंदला संमिश्र प्रतिसाद, राजकीय पक्षांचा बंदला पाठिंबा  

माझं अनुकरण इतरांनीही केलं. २०२१ साली गणपती मूर्ती विक्रीत अनेक प्रतिस्पर्धी पाहायला मिळाले. २०२० नंतर व्यवसाय काहीसा डगमगला मात्र बाप्पाच्या आशीर्वादानं नुकसान झालेलं नाहीये. यंदाच्या वर्षाची सुरुवात चांगली झालीये. मात्र केवळ तीन महिन्याच्या व्यवसायात वर्षाचा खर्च निघत नाही. सप्टेंबर अखेरीनंतर पुन्हा नव्या व्यवसायाचा शोध करावा लागेल, असं सांगत विक्रेत्यानं वाढत्या ग्राहकांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी