30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
HomeमुंबईGaneshotsav 2022 : अजित पवारांनी घेतले सिद्धिविनायक आणि लालबागचा राजा श्रीगणपतीबाप्पांचे दर्शन

Ganeshotsav 2022 : अजित पवारांनी घेतले सिद्धिविनायक आणि लालबागचा राजा श्रीगणपतीबाप्पांचे दर्शन

तब्बल दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा सगळेच सण जल्लोषात, उत्साहात साजरे होत आहेत. यंदाचा गणेशोत्सात सुद्धा लोकांची लगबग, उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. केवळ सर्वसामान्यच नाही तर राजकीय वर्तुळातील अनेक नेते गणरायाच्या दर्शनाला उपस्थिती दर्शवत राज्याच्या विकासासाठी, भरभराटीसाठी मागणं मागत आहेत. 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (दि. 7 सप्टेंबर) मुंबईतील सिद्धीविनायक बाप्पा आणि लालबागचा  राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा विकासाचा गाडा असाच धावता ठेव आणि अव्वल राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकीक कायम राहू दे असे साकडेच अजित पवारांनी गणराकडे घातले आहे. तब्बल दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा सगळेच सण जल्लोषात, उत्साहात साजरे होत आहेत. यंदाचा गणेशोत्सात सुद्धा लोकांची लगबग, उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. केवळ सर्वसामान्यच नाही तर राजकीय वर्तुळातील अनेक नेते गणरायाच्या दर्शनाला उपस्थिती दर्शवत राज्याच्या विकासासाठी, भरभराटीसाठी मागणं मागत आहेत.

राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी सुद्धा आज लालबागचा राजा आणि सिद्धीविनायक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाकडे राज्याकडे भरभरून मागितले. यावेळी पवार म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध कर, राज्यातील सर्व नागरिकांना सुखी ठेव, महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा धावता ठेव, कृषी, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य अशा सर्व क्षेत्रातील देशातील सर्वात प्रगतशील, अव्वल राज्य हा महाराष्ट्राचा लौकिक कायम राहू दे, अशी प्रार्थना करीत अजित पवारांनी बाप्पाकडे मागणे मागितले आहे.

हे सुद्धा वाचा…

BJP : भाजपच्या ‘मिशन लोटस’ विरोधात ‘हे’ नेते उतरले रणांगणात

Arshdeep Singh : ‘तो’ झेल अर्शदीप सिंगला पडला महागात

Suresh Raina Retirement: सुरेश रैना आंतरराष्ट्रीय तसेच आयपील क्रिकेटमधून निवृत्त

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा नुकतीच मुंबईत भेट दिली आणि यावेळी न चुकता त्यांनी लालबागच्या राजाच्या दर्शनाला हजेरी लावली, शिवाय सिद्धीविनायक बाप्पाचे सुद्धा दर्शन घेतले. शाह यांचा हा दौरा राजकीय दृष्ट्या चर्चेचा ठरला असला तरीही त्यांनी बाप्पाच्या दर्शनाला दाखवलेली उपस्थिती सुद्धा सगळ्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरून गेली. त्यावेळी त्यांच्यासोबत विनोद तावडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाय इतर भाजप नेते सुद्धा यावेळी उपस्थित होते.

नेत्यांची गणोशोत्सवातील उपस्थिती सध्या कळीचा विषय बनत चालला आहे. खासकरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वारंवार गणपती दर्शनाला उपस्थिती यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी सडकून टीका करीत आहेत. राज्यातील राजकीय स्थिती कमालीची बदलली असल्याने राजकीय नेत्यांच्या प्रत्येक हालचालीवर सर्वसामान्यांच्या नजरा खिळल्या आहेत, त्यामुळे राजकीय नेत्यांसाठी सामान्य जनतेकडून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी