30 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमुंबईGaneshotsav 2022 : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ स्पर्धेचे...

Ganeshotsav 2022 : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ स्पर्धेचे आयोजन

यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्साचे निमित्त साधत अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयावर गणेशोत्सव देखावा - सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

सलग दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यंदाच्या वर्षी सगळेच सण मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. नेहमीचाच जल्लोष, उत्साह, नाविण्य जपत गणरायाच्या आगमनासाठी अनेकांनी तयारी सुद्धा सुरू केली आहे. अगदी काहीच दिवस शिल्लक असताना सजावट, रंगरंगोटीच्या माध्यमातून कोणता सामाजिक संदेश द्यावा याच्या गडबडीत सध्या सगळे दिसून येत आहेत. दरम्यान, यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्साचे निमित्त साधत अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयावर गणेशोत्सव देखावा – सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष असून या स्पर्धेत सार्वजनिक मंडळांसोबत वयक्तिकरीत्या सुद्धा नागरिकांना यात सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेसाठी सहभाग घेणाऱ्यांनी फोटो आणि ध्वनिचित्रफीत पाठवायचे आहेत. या स्पर्धेसंदर्भात कोणाला अधिकची माहिती मिळवायची असल्यास त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर (https://ceo.maharashtra.gov.in/) भेट द्यावी. येथे सदर स्पर्धेची सविस्तर नियमावली देण्यात आलेली आहे.

गणेशोत्सव मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी 31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या गूगल अर्जावरील माहिती भरून आपल्या देखावा-सजावटी संदर्भातील माहिती पाठवायची आहे. याबाबत कार्यालयाकडून नियमावली सुद्धा देण्यात आली असून त्यासाठी कोणते बक्षीस ठेवले हे सुद्धा नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा…

Jayant Patil : जयंत पाटील यांनी व‍िधानसभा अध्यक्षांवरच डागली तोफ !

Raj Thackeray : लाचार होऊन निवडणूक लढवू नका : राज ठाकरे

Breaking : शिवसेनेतील सत्तासंघर्ष घटनापीठाकडे वर्ग, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ स्पर्धेची नियमावली

 • सदर स्पर्धा वयक्तिक (घरगुती गणेशोत्सव सजावट) आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अशा दोघांसाठी आहे.
 • घरगुती गणेशोत्सव सजावट करणाऱ्यांसाठी अटी – 1) मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही या
  विषयाला अनुसरून केलेल्या घरगुती गणेशोत्सव सजावटीचे विविध कोनांतून काढलेले पाच फोटो पाठवावेत. 2) प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त 5 MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा. 3) मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही याविषयीच्या देखाव्याची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) गूगल अर्जावर जोडावी. 4) ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) आणि फोटो गूगल अर्जावर जोडताना, त्यावर स्पर्धकाचे नाव येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सदर
  अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल. 5) चित्रफितीला आवाजाची जोड (व्हाइस-ओव्हर) देऊ शकता. 6) ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत-जास्त 100 MB असावी, तसेच ही ध्वनिचित्रफित mp4 फॉरमॅटमध्ये असावी आणि ती
  एक ते दोन मिनिटांची असावी.
 • सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी अटी – 1) मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही या विषयाला अनुसरून केलेल्या देखाव्याचे विविध कोनांतून काढलेले पाच फोटो पाठवावेत. 2) प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त 5 MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा. 3) आपल्या गणेशोत्सव मंडळामध्ये केलेल्या मताधिकार, लोकशाहीयाविषयीच्या देखाव्याची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) गूगल अर्जावर जोडावी. 4) ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) आणि फोटो गूगल अर्जावर जोडताना, त्यावर मंडळाचे किंवा मंडळातील कुणा व्यक्तीचे नाव, लोगो येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सदर अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल. 5) ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत-जास्त 500 MB असावी. तसेच ही ध्वनिचित्रफीत mp4 फॉरमॅटमध्ये असावी आणि 10 मिनिटांपेक्षा अधिक असू नये. 6) गणेशोत्सव मंडळाने सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गूगल अर्जावर स्पर्धक म्हणून गणेशोत्सव मंडळाचे नाव लिहून, त्यानंतर डॅशचे चिन्ह (-) देऊन अध्यक्ष किंवा सचिव यांचे नाव लिहावे (उदा. घोलाईदेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – मंदार मोरे) आणि पुढे त्याच व्यक्तीचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक लिहावा. 7) गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किंवा सचिव यांची स्वाक्षरी असलेले पत्र गूगल अर्जावर जोडावे. या पत्राचा नमुना गूगल अर्जावर, जिथे हे पत्र जोडायचे आहे, तिथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
 • स्पर्धकांनी आपले फोटो आणि ध्वनिचित्रफीत https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या गूगल अर्जावरील
  माहिती भरून त्यावर पाठवावेत.
 • ज्या स्पर्धकांना फोटो किंवा ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास अडचण येईल, त्यांनी 8669058325 (प्रणव सलगरकर), 9987975553 (तुषार पवार) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून कळवावे.
 • दिनांक 31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर 2022 या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.
 • बक्षिसांचे स्वरूप :
  १) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे
  असेल :
  अ. प्रथम क्रमांक :- 51,000/
  ब. द्वितीय क्रमांक :- 21,000/-
  क. तृतीय क्रमांक :- 11,000/-
  ड. उत्तेजनार्थ :- 5000 रुपयांची एकूण दहा बक्षिसे.
  २) घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे
  असेल :
  अ. प्रथम क्रमांक :- 11,000/
  ब. द्वितीय क्रमांक :- 7,000/-
  क. तृतीय क्रमांक :- 5,000/-
  ड. उत्तेजनार्थ :- 1,000 रुपयांची एकूण दहा बक्षिसे.
 • मतदान, निवडणूक, लोकशाही या विषयांना अनुसरून साहित्य पाठवणाऱ्या सहभागी सर्व स्पर्धकांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल.
 • आलेल्या देखाव्या-सजावटींमधून सर्वोत्तम देखावे-सजावटी निवडण्याचा तसेच स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील.
 • स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल.
 •  निवडणूक कार्यालयात कार्यरत कर्मचारी / अधिकारी सदर स्पर्धेत सहभागी होऊ शकतात, मात्र त्यांच्या साहित्याचा बक्षिसासाठी विचार केला जाणार नाही.
 • स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल.

दरम्यान या आयोजित केलेल्या स्पर्धेविषयी बोलताना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत मतदार ओळखपत्राला आधार कार्डाची जोडणी, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या, नवीन सुधारणान्वये मतदार नोंदणीसाठी लागू झालेल्या चार अर्हता तारखा यांसाठी प्रसार – प्रचार केला जावा आणि अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन देशपांडे यांनी यावेळी केले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी