मुंबई गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देण्यासाठी जगभरातून भाविक दाखल होतात. गणेशोत्सवानिमित्ताने मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. गणेशोत्सव मंडळात गर्दीवर नियंत्रण राहावे, कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मुंबईतील प्रत्येक गणेश मंडळात पोलिसांकडून ‘गणसेवक’ नेमले जाणार आहेत.
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फळसणकर आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्व्यय समिती सोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उत्सव काळात कुठेही गालबोट लागू नये, कार्यकर्ते तसेच गणेश भक्तांमध्ये वाद होऊ नये यासाठी समन्वयक नेमण्याची गरज बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पोलीस आणि गणेश मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी गणसेवक नेमण्याबाबत सर्वांनी होकार कळवला.
गणेशोत्सव काळात सुरक्षितता अभाधित राहावी, आपत्कालीन परिस्थितीत तोंड देण्यासाठी पोलिसांना मदत मिळावी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जवळपास एक लाख गणसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. या घणसेवकांना पोलिसांकडून आवश्यक मार्गदर्शन प्रशिक्षणही दिले जाईल. पोलिसांकडून मोठ्या गणपती मंडळातील २० तर लहान गणपती मंडळात १० कार्यकर्ते गण सेवक म्हणून निवडले जातील.
हे सुद्धा वाचा
माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा दट्ट्या; ठाणे झेडपी बेरोजगारांचे २२ लाख २८ हजार परीक्षा शुल्काची रक्कम परत करणार!
ऐन गणपतीत फुले महागणार
‘तो’ व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर फिरवणे खोडसाळपणाचे : एकनाथ शिंदे
गणेश मंडळ परिसरात संशयास्पद रित्या फिरणाऱ्या अनोळखी व्यक्ती, तसेच काही गैरप्रकार बद्दल संशय व्यक्त झाल्यास याबद्दल खात्री करून स्थानिक पोलिसांना तातडीने माहिती देणे, गर्दीवर नियंत्रण राखणे हे काम गणसेवक करतील. सुमारे एक लाख नियुक्त गणसेवकांना पोलिसांकडून ओळखपत्रही दिले जाईल.