30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
HomeमुंबईGateway Of India : पुढील काही दिवसांसाठी गेटवे ऑफ इंडिया राहणार बंद

Gateway Of India : पुढील काही दिवसांसाठी गेटवे ऑफ इंडिया राहणार बंद

मुंबई पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी सहा दिवसांपूर्वी एक संशयास्पद बोट सापडली. या बोटीमध्ये शस्त्रात्रे देखील सापडली आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव गेटवे ऑफ इंडिया बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

गेटवे ऑफ इंडिया (Gateway Of India) हे मुंबईतील एक असे पर्यटन स्थळ आहे, जिथे कोणताही पर्यटक गेल्याशिवाय राहूच शकत नाही. त्यामुळे याठिकाणी सुट्ट्यांच्या दिवसांव्यतिरिक्त देखील तितकीच गर्दी पाहायला मिळते. पण आता पुढील काही दिवसांसाठी गेटवे ऑफ इंडिया हे पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मुंबई पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी सहा दिवसांपूर्वी एक संशयास्पद बोट सापडली. या बोटीमध्ये शस्त्रात्रे देखील सापडली आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव गेटवे ऑफ इंडिया बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. परंतु आता मुंबई फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना या ठिकाणी जाता येणार नसल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात असलेल्या हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर मागील आठवड्यात 18 ऑगस्ट रोजी संशयास्पद बोट आढळून आली. ज्यामुळे रायगड जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले होते. या बोटीमध्ये यावेळी तीन AK-47 बंदुका आणि गोळ्या सापडल्या, ज्या पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या. पण या संशयास्पद बोटीच्या सापडण्यानंतर राज्यात हाय अलर्ट देण्यात आला होता.

दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सदर बोटीचा कोणत्याही घातपाताशी काहीही संबंध नाही अशी माहिती दिली. पण तरीसुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव पुढील काही दिवसांसाठी गेटवे ऑफ इंडिया बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या तरी ज्या लोकांकडे बोटीचे तिकीट आहे, अशाच लोकांना बोटीतून प्रवास करण्यासाठी आतमध्ये सोडण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईमध्ये घडलेला 26/11 चा हल्ला हा आजही सर्व मुंबईकरांच्याच नाही तर संपूर्ण भारताच्या लक्षात आहे. 26/11 च्या आठवणींमुळे आजही मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो. 26/11 च्या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांकडून गेटवे ऑफ इंडियाला प्रामुख्याने लक्ष करण्यात आले होते., त्यावेळी समुद्री मार्गानेच दहशतवाद्यांनी मुंबईमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर समुद्री सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पण आता अचानक हरिहरेश्वर समुद्र किनारी शस्त्रास्त्रांची बोट सापडल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट झालेली पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

Terrorism: पुण्यात एटीएसने एका दहशवाद्याच्या मुसक्या आवळल्या

Nilesh Rane : हरिहरेश्वर येथे सापडलेल्या बोटीवरुन निलेश राणेंनी उपटले सरकारचे कान

Security of India : भारताची सुरक्षा धोक्यात, धमकी देणारा IS चा दहशतवादी रशियात सापडला

मुंबईमध्ये जल्लोषात साजरी केला जाणारा गणेशोत्सव सण देखील आठवड्याभरावर येऊन ठेपल्याने अधिकच काळजी घेण्यात येत आहे. तसेच हरिहरेश्वर समुद्र किनारी संशयास्पद बोट सापडल्यानंतर वाहतूक पोलीस यंत्रणेला सुद्धा मुंबईमध्ये पुन्हा एकदा हल्ला होण्याचा मॅसेज आला होता. तर मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सना सुद्धा धमकीचे फोन येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सुरक्षा यंत्रणा अधिक अलर्ट झाली असून पुढील काही दिवस गेटवे ऑफ इंडिया बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी