26 C
Mumbai
Wednesday, November 23, 2022
घरमुंबईMumbai Bridge : अंधेरीतील गोखले पूल तब्बल दोन वर्षे राहणार बंद

Mumbai Bridge : अंधेरीतील गोखले पूल तब्बल दोन वर्षे राहणार बंद

मुंबईतील अंधेरी येथील सर्वाधिक वाहतूक होणारा गोखले पूल आता सुरुस्तीच्या कारणास्तव पुढील दोन वर्ष बदन ठेवण्यात येणार आहे, याबाबतची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा पूल येत्या 7 नोव्हेंबर पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये असे अनेक वाहतुकीचे पूल (Bridge) आहेत, जे वाहतूक करण्यासाठी असुरक्षित आहेत. आजवर मुंबईत असुरक्षित पुलांच्या अनेक दुर्घटना देखील घडल्या आहेत. ज्यामध्ये अनेक निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच कारणास्तव मुंबईतील अंधेरी येथील सर्वाधिक वाहतूक होणारा गोखले पूल आता सुरुस्तीच्या कारणास्तव पुढील दोन वर्ष बदन ठेवण्यात येणार आहे, याबाबतची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा पूल येत्या 7 नोव्हेंबर पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. काही दिवसांपुरी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांकडून या पुलाची पाहणी करण्यात आली होती. या पाहणीनंतर मुंबई मनपा आणि मुंबई पोलिसांकडून या पुलाच्य पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेकडून नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार कंपनीकडून देखील गोखले पूल असुरक्षित असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर हा पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जाणारा गोखले पूल बंद झाल्यानंतर मुंबईकरांना प्रवासासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पूल बंद झाल्यानंतर प्रवाश्यांना वाहतूक करता यावी यासाठी खार सबवे (खार), मिलन सबवे उड्डाणपूल (सांताक्रूझ), कॅप्टन गोरे उड्डाणपूल (विलेपार्ले उड्डाणपूल), विलेपार्ले, अंधेरी सबवे (अंधेरी), बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल (जोगेश्वरी) आणि मृणालताई गोरे उड्डाणपूल (गोरेगाव) हे सहा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

2018 मध्ये जुलै महिन्यात गोखले पुलाचा एक भाग कोसळला होता. हा भाग अंधेरी रेल्वे स्थानकावर कोसळला. यावेळी त्या स्थानकावर उपस्थित असलेल्या दोघांना आपले प्राण गमवावे लागले होते. सकाळच्या वेळी घडलेल्या या घटनेमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. त्यावेळी गोखले पुलाची घटना घडल्यानंतर मुंबई महापालिकेकडून मुंबईतील इतर पूलांचे ऑडिट करण्यात आले होते. तसेच मुंबई आयआयटी कडून देखील शहरातील पुलांचे ऑडिट करण्यात आले होते.

या घटनेनंतर गोखले पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर हळूहळू करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पण आता पून्हा एकदा या पुलावरील वाहतूक वाढल्याने आणि पूल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याने या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

Maharashtra Politics : आमदार फुटीच्या वक्तव्यावरून काँग्रेस-ठाकरे गटात ‘तू-तू.. मैं-मैं’

First Indian Voter Death : भारताच्या पहिल्या मतदाराचे झाले निधन

Mumbai News : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई ! मुलींची तस्करी करणारी टोळी गजाआड

दरम्यान, हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता मुंबई पोलिसांकऑडन सहा पर्यायी मार्ग मुंबईकरांना वाहतुकीसाठी देण्यात आले आहेत. परंतु याबाबत मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. जे सहा मार्ग मुंबई पोलिसांनी वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी आणखी वाढणार असल्याचे मत मुंबईतील वाहनचालकांनी व्यक्त केले आहे. अंधेरी सबवे मार्ग हा गोखले रोड पुलावर असलेल्या क्षमते इतकी वाहतूक करण्यास असमर्थ आहे. तर, विलेपार्ले स्थानकाजवळ असलेला कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपूल लहान असून या मार्गावरील रस्ते अरुंद गल्ल्यांतून जातात. या मार्गाजवळ शाळा आणि निवासी इमारती आहेत. त्यामुळे येथून वाहतूक वळवल्यास आणखी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोखले पूल बंद झाल्यानंतर विलेपार्ले ते जोगेश्वरी दरम्यानची संपूर्ण वाहतूक कोलमडून पडेल, अशी भीती स्थानिकांना आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!