34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईगुड न्यूज | मान्सून 8 ते 10 जूनपर्यंत मुंबई, कोकणात पोहोचणार

गुड न्यूज | मान्सून 8 ते 10 जूनपर्यंत मुंबई, कोकणात पोहोचणार

येत्या 2-3 दिवसातच मान्सून केरळात पोहोचेल, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मान्सूनची देशभरात आगेकूच होईल.

उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर, राज्यातील शेतकरी या सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे. मान्सून 8 ते 10 जूनपर्यंत मुंबई, कोकणात पोहोचणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, रेंगाळलेला मान्सून आता पुन्हा सक्रीय झाला आहे. येत्या 2-3 दिवसातच मान्सून केरळात पोहोचेल, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मान्सूनची देशभरात आगेकूच होईल.

मुंबईसह राज्यात सर्वत्र गेले काही दिवस भयंकर उष्मा आहे. त्यामुळे मान्सूनची आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे. राज्यात मान्सून कधी दाखल होणार, त्याचे आता वेध लागले आहेत. हवामान खात्याने मान्सूनचे भाकीत वर्तविले असून त्याच्या वाटचालीची नेमकी स्थिती जाहीर केली आहे.

मान्सून म्हणजेच नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) मोसमी वारे. हे वारे मंगळवारी बंगालच्या उपसागर क्षेत्राकडे सरकले आहेत. मान्सून अंदमान-निकोबारमध्येही आता सक्रीय होत असल्याची चिन्हे आहेत. मान्सूनच्या आगेकूचसाठी ही स्थिती अतिशय अनुकूल आहे. यापूर्वी पोर्ट ब्लेअरपासून 425 किमी अंतरावर असलेल्या नानकोवरी बेटावर वारे कमकुवत झाल्याने मान्सून अडकला होता. त्यामुळे साधारणपणे केरळमध्ये 1 जून रोजी दाखल होणारा मान्सून यंदा 4-5 दिवस उशिराने येत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, केरळात 4 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल. त्यानंतर त्याचे 8 ते 10 जूनपर्यंत मुंबई, कोकणात आगमन होऊ शकेल. राज्यात सर्वत्र मान्सून पोहोचायला 16 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

कोकण, गोव्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा 

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळातून ओलावा येत राहिल्याने देशात अनेक भागात पाऊस पडत राहिला. 23 मे पासून वेस्टर्न डिस्टर्बन्स देखील सक्रिय झाले. मे महिन्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत ही व्यवस्था कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे महिना संपायाला येऊनही यंदा उत्तर भारतातील कोणत्याही राज्यात उष्णतेची तीव्र लाट नव्हती. आता मात्र उष्णतेच्या लाटेचा इशाराय देण्यात आला आहे. दमट हवा आणि उच्च तापमानामुळे, उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये 31 मे ते 4 जून दरम्यान तर कोकण, गोवा आणि  गुजरातमध्ये  31 मे आणि 1 जून रोजी  उष्ण आणि अस्वस्थकारक हवामानाची शक्यता आहे

देशातील मान्सून आता येत्या 2-3 दिवसातच सक्रीय होण्याची चिन्हे दिसत आहेत. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरासह कमोरीयन व मालदीव बेटांवर येत्या 2-3 दिवसात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती दिसत असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. येत्या 2-3 दिवसांत महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे. येत्या काही दिवसात राज्यात तीव्र हवामान राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

 

हे सुद्धा वाचा :

सततचा पाऊस नैसर्गिक आपत्तीत अनेक किचकट, तांत्रिक अटींचा महापूर

राजकारणाच्या वादळावर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

प्राजू कुठे आहेस ?..काय धुकं, काय पाऊस, काय डोंगर.. लय मज्जा..हाय !

संपूर्ण अंदमान निकोबार बेटासह बंगालच्या उपसागर क्षेत्रात सध्या मान्सून पोहोचला आहे. यंदा खरेतर दोन दिवस आधीच, 19 मे रोजी मान्सूनने दक्षिण बंगाल उपसागरातून निकोबार बेटांसह दक्षिण अंदमानापर्यंत धडक मारली होती. पुढे मात्र मान्सूनची प्रगती थंडावली होती. आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सून 4 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे.

Monsoon Reaching Mumbai, Konkan Rain, Mansoon Update, IMD, Good News

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी