26 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरमुंबईहसन मुश्रीफांना उच्च न्यायालयाचा दिलासा; ईडीला दिले 'हे' निर्देश

हसन मुश्रीफांना उच्च न्यायालयाचा दिलासा; ईडीला दिले ‘हे’ निर्देश

मा. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि मा. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने सुरू केलेली चौकशी आणि त्यांना बजावलेल्या समन्सला आव्हान देत, ही बेकायदेशीर कारवाई तातडीने रोखण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्याविरुद्ध नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्याची मागणी याचिकेवर आज (14 मार्च) मा. उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफांवर (Hasan Mushrif) भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते. कोल्हापुरात शेतक-यांची 40 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कागल तालुक्यात हा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर, मा. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना तत्काळ दिलासा देत पुढील दोन आठवडे हसन मुश्रीफ यांना अटक न करण्याचे निर्देश अंमलबजावणी संचालनालयाला दिले असून हसन मुश्रीफ यांना सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबत अटकपूर्व जामिन अर्जावर तातडीने सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश मा. उच्च न्यायालयाने मा. सत्र न्यायालयाला दिले आहेत. त्याचप्रमाणे ईसीआयआर रद्द करण्याबाबतची सुनावणी काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : 

ईडीच्या छाप्यानंतर मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक; दोन महिन्यात तिसऱ्यांदा टाकली धाड

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा प्रकरण ; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलांची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

हसन मुश्रीफ यांच्यावर 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; वाचा नेमकं प्रकरण

प्रकरण काय?
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्स प्रकरण, आप्पासाहेब पाटील साखर कारखाना ब्रिक्स कंपनीनं चालवायला घेतला होता. याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आरोप केला होता. या प्रकरणात मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, ईडीने या आधी सुद्धा त्यांचावर कारवाई केली होती. मात्र सुडबुद्धीतून गुन्हा दाखल केल्याचा आरोप मुश्रीफ समर्थकांनी केला आहे. या षडयंत्रामुळे कोल्हापुरात कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी प्रशासनाची जबाबदारी राहिल असा इशाराही मुश्रीफ समर्थकांनी दिला होता. यादरम्यान ईडीच्या झालेल्या तिसऱ्या छाप्यानंतर karykrtaynni त्यांच्या घराभोवती गर्दीकरून ईडीच्या कार्याचा निषेध केला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी