28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeमुंबईCocaine : बापरे ! त्याने तब्बल 87 कोकेनच्या गोळया पोटात लपवल्या, कस्टमने...

Cocaine : बापरे ! त्याने तब्बल 87 कोकेनच्या गोळया पोटात लपवल्या, कस्टमने घेतली झडती

मुंबई विमानतळावरुन 13 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याने पोटामध्ये चक्क 87 कोकेनच्या कॅप्सूल लपवल्या होत्या. मुंबई कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर ही कारवाई केली आहे. या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे.

आपल्या देशात गेल्या अनेक वर्षांपासून आमली पदार्थांची मोठया प्रमाणात तस्करी होत आहे. या घटनांमध्ये मुंबई शहर अग्रेसर आहे. या पुर्वी घडलेल्या घटनांमधून हे स्पष्ट झाले आहे. नुकतीच एक आमली पदार्थ तस्कीरीची घटना उघड झाली आहे. मुंबई विमानतळावरुन 13 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याने पोटामध्ये चक्क 87 कोकेनच्या कॅप्सूल लपवल्या होत्या. मुंबई कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर ही कारवाई केली आहे. या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. या प्रकरणामुळे मुंबई विमानतळावरचा तपास आणखी कडक करण्यात आला आहे.

 

या व्यक्तीने 3 दिवसांमध्ये या 87 कॅप्सुल खाल्ल्या होत्या. 28 ऑगस्टला मुंबई विमानतळावरील कस्टमच्या अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला अटक केली होती. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या पोटातून 87 कोकेनच्या गोळया काढण्यात आल्या.‍ पश्चिम आफ्रिकेतील घाना देशातून आलेली ही व्यक्ती होती. त्या व्यक्तीकडून एक पॅक्सही जप्त करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

BJP : ‘कमळाबाईमध्ये आई, ताई व कडक लक्ष्मी सुद्धा आहे’

BMC : मनपाच्या मुख्य लिपीक परिक्षेमध्ये मोठा घोटाळा, नापास उमेदवारांना केले पास

Ashok Chavan : अशोक चव्हाण – देवेंद्र फडणवीस भेट, अन् इन्कम टॅक्सची धाड !

मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आमली पदार्थ तस्करीच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. या प्रकरणात अनेक जणांना अटक देखील करण्यात आली आहे. या प्रकरणात भारतीय लोकांप्रमाणे परदेशी नागरिकांचा देखील मोठा सहभाग आहे. त्यामुळे या प्रकरणी सरकारने कडक पावले उचलण्याची गरज आहे. आपल्या देशामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अफ्रिकेतील लोक राहत आहेत. ज्यांना आपण न‍िग्रो असे संबोधतो. हे लोक वर्षानुवर्षे मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये राहत आहेत.

Cocaine : बापरे ! त्याने तब्बल 87 कोकेनच्या गोळया पोटात लपवल्या, कस्टमने घेतली झडती

ते कुठून आले आहेत ? ते काय करतात ? कोणता व्यवसाय करतात या विषयी कोणालाही माहिती नाही. ते मुंबईमध्ये राहतात. अनेकदा महिला आणि पुरुष लोकलमधून प्रवास करतांना दिसतात. लोक त्यांच्याकडे परदेशी नागरीक म्हणून कुतूहलाने बघतात. हेच कुतूहल सरकामध्ये असायला हवे. कारण मोठया प्रमाणात ड्रग्ज तस्‍करी होत असून, तरुणाई याला बळी पडत आहे. यावेळी सापडलेली व्यक्तीही घाना देशातील आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी