30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमुंबईराज्याचे 6 बस चालक ठरले 'हिरोज ऑन द रोड'चे मानकरी

राज्याचे 6 बस चालक ठरले ‘हिरोज ऑन द रोड’चे मानकरी

सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये बस हे अत्यंत महत्वाचे साधन मानले जाते. खिशाला परवडणारा स्वस्त प्रवास करण्यासाठी खूपजण बसचा वापर करतात. एसटी महामंडळाच्या ताफ्यात जवळपास सतरा हजार बसगाड्या आहेत. या बसद्वारे प्रवाशांना दैनंदिन सेवा दिली जात असून, रोज लाखो प्रवासी बसमधून प्रवास करतात. बसस्थानकांवरही प्रवाशांची कायमच गर्दी असते. प्रवासादरम्यान प्रवाशांची काळजी आणि रस्ते अपघात नियंत्रण, प्रवाशांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही चालकाची असते. अशा जबाबदार बस चालकांचे कार्य लक्षात घेऊन त्यांचा राष्ट्रस्तरावर सत्कार करण्यात येतो.

विशेषतः देशात बस चालवताना सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच रस्ते अपघात रोखण्यासाठी बस चालकांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करण्यात येतो. याच उद्देशाने असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्टच्या अंडरटेकिंगच्या (एएसआरटीयू) वतीने ‘हिरोज ऑन द रोड’ असा पुरस्कार देवून देशभरातील 42 चालकांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 6 चालकांचा त्यात समावेश आहे.

स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग असोसिएशनतर्फे राष्ट्रीय स्तरावरील अपघातमुक्त चालकांचा सन्मान करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ नवी दिल्ली येथे आज हिरोज ऑन द रोड सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सन्मानासाठी, देशभरातून 42 चालकांची निवड करण्यात आली, ज्यांनी त्यांच्या सेवेदरम्यान कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा अपघात केला नाही आणि बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली.

पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन चालकांचा सत्कार करण्यात आला. घोडके किसन रामभाऊ (36 वर्ष, अपघातमुक्त सेवा) आणि मोहम्मद रफिक अब्दुल सत्तार मुल्ला (29 वर्ष, अपघातमुक्त सेवा) अशी गुणवंत चालकांची नावे आहेत. याशिवाय नवी मुंबई महानगपालिका वाहतूक सेवेतील नंदकुमार लवंड (26 वर्ष, अपघातमुक्त सेवा), सोलापूर महानगरपालिका वाहतूक सेवेतील आवटे राजेंद्र महादेव (25 वर्ष, अपघातमुक्त सेवा), पुणे महानगर परिवहन महामंडळातील करूण नारायण कुचेकर (24 वर्ष, अपघातमुक्त सेवा), बेस्ट सेवेतील गिरीराजशंकर लालताप्रसाद पांडे (21 वर्ष, अपघातमुक्त सेवा) यांचा नुकताच गौरव करण्यात आला. त्यामुळे राज्यस्तरातून कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा: 

आता महिलांसाठी बस तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत; महाअर्थसंकल्पातील महिला विशेष योजना

MSRTC: लालपरीचे लालडब्यात रूपांतर होण्यापूर्वी महामंडळाचा महत्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर

एसटी संप काळात मृत्यू झालेल्या १२४ कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार नोकरी

Heroes on the Road 2023 honored 6 bus drivers of maharashtra

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी