26 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमुंबईबाबासाहेबांना छळणारे हिंदू, पारसी माफी मागतील का - जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

बाबासाहेबांना छळणारे हिंदू, पारसी माफी मागतील का – जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

मुलुंड येथे एक मराठी व्यावसाईक महिलेला ती फक्त मराठी असल्याने कार्यालयसाठी जागा नाकारण्यात आली. त्यानंतर त्या घर मालकावर गुन्हा दाखल झाल्यावर त्याने माफी मागितली. असे असताना, हिंदू, पारसी तसेच इतर सगळ्याच समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा छळ केला हे समाज बाबासाहेबांची माफी मागतील का ? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ‘आदालजी सोराबजी हे नाव तुमच्या ओळखीचे आहे काय?  काय ??? ओळखल नाहीत ? अरे निट आठवा बघा आठवतय का.. अच्छा माहिती नाही .. हाच तर तुमचा-आमचा देशाचा उद्धारकर्ता ! ज्या पारसी धर्मशाळेत राहायला जागा मिळावी म्हणून मी पारसीच आहे असे सांगून ज्या नावाने बाबासाहेबांनी रूम घेतली होती, ते नाव होत – आदालजी सोराबजी’ अशा हृदयद्रावक आठवणींना आव्हाड यांनी उजाळा दिला आहे.

‘जेव्हा कोलंबीया युनिवर्सीटीमधून शिक्षण घेऊन बाबासाहेब आंबेडकर भारतात परतले. स्कॉलरशिप एग्रीमेंन्टनुसार बडोदा संस्थानमध्ये नोकरी करायला ते गेले. राहण्यासाठी रुम शोधायला सुरुवात केली. अर्थात जातीमुळे रूम द्यायला कोणीही तयार नव्हते. ना लॉज द्यायला. आपल्याला जातीमुळे रुम मिळू शकत नाही याची खात्री झाल्यावर बाबासाहेब एका पारसी समाजाच्या धर्मशाळेवर गेले तिथेही तेच, हे लक्षात आल्यावर, आपण पारसीच आहोत हे त्यांनी खोटे सांगितले. रुम मिळाली. राहीले. लवकरच  लोकांना समजले हा तर अस्पृश्य जातीतील. लाठीकाठी घेऊन मारायला आले. आताच्या आता रुम खाली कर. कशीतरी  हिम्मत आणून  त्या मारायला आलेल्या घोळक्याला बाबासाहेब सांगतात, मी लगेचच रुम नाही सोडत मी उद्या सोडतो. दुसऱ्या दिवशी दिवसभर एका पार्कमध्ये त्यांची पेटी-बॕग पुस्तके सामान घेऊन हताश होऊन बाबासाहेब बसून राहतात. ट्रेनला उशीर होता. या आलेल्या भयंकर अनुभवा नंतर बाबासाहेब बडोदा सोडतात.’ असेही आव्हाड यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा 

गांधीजींचे विचार शिल्लक नाहीत, गुणरत्न सदावर्तेंच्या वक्तव्याने काँग्रेस आक्रमक
जयंत पाटलांनी वाजविली स्वत:चीच टिमकी, अजित पवार गटाने घेतले सगळ्यांना सामावून !
खुशखबर! तृतीय पंथीयांना मिळणार हक्काची घरे; रामदास आठवले पाठपुरावा करणार

‘कालची ती घटना, मुंबईमध्ये मराठी बाईला रुम नाकारली. गुजराथी माणसांवर केस झाली. त्यांनी माफी मागीतली. पण हिंदू, पारसी इतर सगळ्याच समाजाने बाबासाहेबांचा छळ केला हा समाज बाबासाहेबांची माफी मागेल का ?
ज्या पारसी धर्मशाळेत राहायला जागा मिळावी म्हणून मी पारसीच आहे  असे सांगून ज्या नावाने बाबासाहेब रूम घेतली होती, ते नाव होते – आदालजी सोराबजी’ अशी आठवण आव्हाड यांनी जागवली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी