28 C
Mumbai
Thursday, March 23, 2023
घरमुंबईजा आणि आधी भारतीय संस्कृती शिका!

जा आणि आधी भारतीय संस्कृती शिका!

बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेदच्या नंगटपणाविरोधात 'एल्गार' पुकारलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या आता अधिक आक्रमक झाल्या असून जोपर्यंत उर्फी जावेद पूर्ण कपडे घालत नाही तोवर मी शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र, उर्फीने चित्रा वाघ यांना भारतीय संस्कृती जाणून घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यातील ''अभिव्यक्तिस्वतंत्र्यावरून" सुरु असलेले युद्ध कोणत्या थराला जाते याबाबत सर्वसामान्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Vagh) यांनी अभिनेत्री उर्फी जावेदविरोधात (Urfi Javed) आक्रमक पवित्रा घेतला असून जोपर्यंत तिच्याविरोधात कारवाई होत नाही आणि जोपर्यंत ती पूर्ण कपडे परिधान करत नाही तोवर आपण शांत बसणार नाही, असा इशारा दिला आहे. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मात्र, त्यांच्या विरोधाला न जुमानता “माझा नंगा नाच सुरूच राहील,” असे बेधडकपणे सांगत उर्फीने वाघ यांना डिवचले होते.  त्यामुळे आता वाघ यांच्या आक्रमकतेला अधिक धार चढली असून माझी लढाई उर्फीच्या विरोधात नसून तिच्या विकृतीविरोधात असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. वाघ यांना उर्फी जावेद हिने पुन्हा एकदा सुनावले असून प्राचीन काळातदेखील हिंदू महिलांना त्यांच्या आवडीनुसार पोशाख परिधान करण्याचा अधिकार होता. जा आणि आधी भारतीय संस्कृती शिका! अशा शब्दांत उर्फी जावेदने वाघ यांना टोला लगावला आहे. (Go and learn Indian culture first!)

हे सुद्धा वाचा

बनावट कामगार नेत्यांचे कंबरडे मोडा; देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश

VIDEO: उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद शिगेला

चित्रा वाघ खुलासा करा, अन्यथा एकतर्फी कारवाई; राज्य महिला आयोगाची नोटीस

उर्फीच्या तोकड्या कपड्यांवर आक्षेप घेणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर उर्फीनेही तितक्याच आक्रमकपणे पलटवार केला आहे. उर्फीने ट्विट करत वाघ यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यात तिने म्हटले आहे की, “एकीकडे त्यांना हिंदू राष्ट्र हवे आहे आणि दुसरीकडे महिलांच्या कपड्यांवर निर्बंध घालणारे तालिबानी कायदे त्यांना लागू करायचे आहेत. हिंदू धर्म हा सर्वात प्राचीन धर्म आहे. हिंदू धर्मात महिलांबाबत नेहमीच उदारतेचे धोरण पाहायला मिळते.” या पार्श्वभूमीवर आता उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यातील हा सामना अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

प्राचीन काळात हिंदू महिलांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य होते
उर्फी जावेदने प्राचीन काळातील महिलेचे छायाचित्र ट्विट करत त्या काळातदेखील हिंदू महिलांना त्यांच्या आवडीनुसार पोशाख परिधान करण्याचा अधिकार होता, असे म्हंटले आहे. प्राचीन काळातील हिंदू महिला कशाप्रकारे वस्त्रालंकार करायच्या ते पहा. हिंदू हे उदारमतवादी, सुशिक्षित होते. महिलांना त्यांच्या आवडीनुसार कपडे परिधान करण्याचा अधिकार होता. त्या विविध खेळांत आणि राजकारणातही सहभागी होत होत्या. त्या काळात स्त्री-पुरुष समानता होती. जा आणि आधी भारतीय संस्कृती शिका! अशा शब्दांत उर्फी जावेदने वाघ यांना सुनावले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी