29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; गैरवर्तन केल्यास पाच परीक्षांसाठी निलंबन

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; गैरवर्तन केल्यास पाच परीक्षांसाठी निलंबन

परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी काही विद्यार्थी कॉपी करण्याच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या अमलात आणत असतात. मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटातील मुन्नाभाईसारखे अनेक मुन्नाभाई परीक्षेच्या कालावधीत अनेकदा पकडले जातात. पण आता या कॉपीबहाद्दरांची गय केली जाणार नाही. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने १० वी आणि १२ वी परीक्षांबाबत एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. यापुढे उमेदवाराने परीक्षेचा पेपर चोरल्यास, मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर घेतला, विकत घेतला किंवा पाठवला तर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील पाच परीक्षांसाठी संबंधित विद्यार्थ्याचे निलंबन करण्यात येणार आहे. (Important news for 10th, 12th students; Suspension for five examinations for misconduct)

Important news for 10th, 12th students; Suspension for five examinations for misconduct

 

महाराष्ट्राच्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे कडक शिक्षा भोगावी लागणार आहे. परीक्षेतील गैरप्रकारांना पायबंद बसावा यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियम कडक करण्यात आले आहेत. उमेदवाराने परीक्षेचा पेपर चोरल्यास, मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर घेतला, विकत घेतला किंवा पाठवला तर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील पाच परीक्षांसाठी विद्यार्थ्याचे निलंबन करण्यात येणार आहे. यासोबतच संबंधित विद्यार्थ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

 

हे सुद्धा वाचा

COW HUG DAY : मोदी होली काऊ अदानीला हग करून बसलेत, आम्ही कशी मिठी मारणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाची ठाण्यात, राज्यात, सोशल मीडियावर धूम!

राजभैय्या..! तुमच्या मित्राचं सरकार आलं आहे, अजान बंद कधी करणार? तोगडियांचा राज ठाकरेंना खोचक सवाल

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी