30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमुंबईहिंदुत्ववाद्यांच्या मैदानात राहुल गांधींनी केले नरेंद्र मोदींना चीतपट!

हिंदुत्ववाद्यांच्या मैदानात राहुल गांधींनी केले नरेंद्र मोदींना चीतपट!

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना भाजपने सतत 'पप्पू' म्हणून हिणवले. भाजपच्या मीडिया सेलने यासाठी युद्धपातळीवर प्रचारमोहीम हाती घेतली होती. पण याच 'पप्पूने' म्हणजेच राहुल गांधी यांनी २०२४ साली भारताचे पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा खुद्द लोकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे सिद्ध होत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेले सुरेश चव्हाणके यांनी पंतप्रधान पदासाठी लोकांचे मत अजमावण्यासाठी ट्विटरवर एक जनमत चाचणी घेतली. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान पदासाठी चार पर्याय लोकांसमोर ठेवले होते. नरेंद्र मोदी, राहुल गांधी, आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार असे चार पर्याय होते. @narendramodi@RahulGandhi@NitishKumar@ArvindKejriwal#PollForPM असे या जनमत चाचणीअंतर्गत ‘प्रधानमंत्री के रूप मे २०२४ के लिए आपकी पसंद कौन है?’ असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यामध्ये लोकांनी सर्वाधिक पसंती काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चव्हाणके यांनी हात दाखवून अवलक्षण करून घेतले आहे. (In the field of Hindutva, Rahul Gandhi beat Narendra Modi!)

In the field of Hindutva, Rahul Gandhi beat Narendra Modi!

पंतप्रधान म्हणून २०२४ मध्ये तुम्ही कोणाला पसंती द्याल? असा सवाल लोकांना याद्वारे विचारण्यात आला आहे. ५४ टक्के लोकांनी २०२४ मध्ये राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान झालेले पाहायला आवडेल, असे मत व्यक्त केले आहे. ‘भारत जोडो” यात्रेनंतर राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली असल्याचे दिसत आहे. नरेंद्र मोदी हे दुसऱ्या स्थानावर फेकले गेले असून त्यांना ४१ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. नितीश कुमार यांना केवळ ३ टक्के तर नरेंद्र मोदी यांच्या कट्टर विरोधक असलेल्या ममता बॅनर्जी यांनादेखील फक्त ३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. खुद्द हिंदुत्ववाद्यांच्या व्यासपीठावरच मोदींना लोकांनी झिडकारले आहे. यावर लोकांनी उपरोधिक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

In the field of Hindutva, Rahul Gandhi beat Narendra Modi!

सुरेश चव्हाणके यांनी घेतलेल्या या जनमत चाचणीवर लोकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत… 

 

हे सुद्धा वाचा

राहुल गांधी म्हणाले, RSS-BJPवाले माझे गुरु; भारत जोडो यात्रा यशस्वी केल्याबद्दल मानले भाजप, संघाचे आभार !

RSS : आरएसएसने बॉम्बस्फोटांचे दिले प्रशिक्षण, स्वयंसेवकाच्या दाव्याने खळबळ

Bharat Jodo Yatra : राज्यातील महिला मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेत सहभागी : जयराम रमेश

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी