28.7 C
Mumbai
Sunday, May 14, 2023
घरमुंबईसंतापजनक : महसूल, आरोग्य विभागाचा नालायकपणा ; शिवाजी महाराजांचा अनमोल ठेवा धुळीत

संतापजनक : महसूल, आरोग्य विभागाचा नालायकपणा ; शिवाजी महाराजांचा अनमोल ठेवा धुळीत

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी गडावर आज १९ फेब्रुवारी रोजी शासकीय कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. यावेळी शिंदे-फडणवीस सरकारने ‘डीपीडीसी’मध्ये प्रतिवर्षी ३ टक्के निधी गडकिल्ल्यांसाठी राखून ठेवल्याचा निर्णय घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे वेगवेगळ्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मात्र, साताऱ्यातील मागील दोन-तीन वर्षांपासून बंद पडलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे शिंदे-फडणवीस सरकारच्याच महसूल आणि आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे उघडकीस आले आहे. महसूल आणि आरोग्य विभागाच्या नालायकपणामुळे या संग्रहालयातील शिवकालीन अनमोल ठेवा धूळ खात पडला आहे. त्यामुळे सरकारला खरोखरच शिवरायांबद्दल आदरभाव आहे का? याबाबत सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला आहे. (Incompetence of Revenue, Health Department; Shivaji Maharaj’s treasure in dust)

Incompetence of Revenue, Health Department; Shivaji Maharaj's treasure in dust
साताऱ्यातील मागील दोन-तीन वर्षांपासून बंद पडलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे शिंदे-फडणवीस सरकारच्याच महसूल आणि आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

सातारा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात करोनाकाळात तात्पुरत्या स्वरूपात कोविड सेंटर उभारण्यात आले होते. मात्र, कोविडची साथ आटोक्यात आल्यानंतरही या संग्रहालयातील कचरा उचलण्यात आला नव्हता. याबाबत संबंधित खात्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी दाद दिली नाही, असे साताऱ्याचे उप-नगराध्यक्ष सुहास राजे-शिर्के यांनी सांगितले. त्यामुळे स्वतः हातात झाडू घेत या ठिकाणी झाडलोट केल्याचे त्यांनी सांगितले. यासंबंधी प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित विभागाला जाग आली. त्यानंतर हे संग्रहालय पुन्हा सुरु करण्यासाठी दोन महिने मिनतवाऱ्या केल्या पण तरीसुद्धा प्रशासन ढिम्मच राहिले. हे कोविड सेंटर बंद करून संग्रहालय पुन्हा सुरु केले नाही, तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल, असा इशारा राजे-शिर्के यांनी दिल्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही. प्रशासनाच्या या निर्लज्ज वागणुकीने संतप्त झालेल्या राजे-शिर्के यांनी अखेर शिवजयंतीच्या आधी याबाबत योग्य ती पावले उचलावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर संबंधित कंत्राटदाराने राजे-शिर्के यांच्याशी चर्चा केली. पण अद्यापही हे संग्रहालय सुरु करण्यात आले नाही. याप्रकरणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी राजे-शिर्के यांनी केली आहे.

Incompetence of Revenue, Health Department; Shivaji Maharaj's treasure in dust
जहागिरींच्या पत्रावर शिवाजी महाराजांनी चंदनाच्या द्रवातील हा ठसा उमटवला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चंदनमिश्रित पाण्यातील उजव्या हाताचा एकमेव ठसा या संग्रहालयात आहे. जहागिरींच्या पत्रावर शिवाजी महाराजांनी चंदनाच्या द्रवातील हा ठसा उमटवला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुमारे साडे तीनशे वर्षांनीही त्या ठशातील शिवरायांच्या हाताच्या बारीक रेषाही अगदी स्पष्टपणे दिसतात. छत्रपतींची राजगादीदेखील याच संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आली आहे. शिवरायांच्या स्पर्शाने ही राजगादी पावन झाली आहे. याच गादीवरून सातार घराण्याचे छत्रपती राज्यकारभार चालवायचे. या संग्रहालयात शिवकालीन असंख्य नाणी, ३०० शिक्के, तलवारी, सोन्या-चांदीचे अलंकारही जतन या ठिकाणी करण्यात आले आहेत, अशी माहिती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रमोद शिंदे यांनी दिली.

Incompetence of Revenue, Health Department; Shivaji Maharaj's treasure in dust

श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात कोविड रुग्णांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेली स्वच्छतागृहे अद्यापही हटविण्यात आली नाहीत. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी या प्रकरणी लक्ष घालून संबंधितांना त्वरित सूचना द्याव्यात, अशी मागणी साताऱ्याचे उप-नगराध्यक्ष सुहास राजे-शिर्के यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

धनुष्य-बाण, शिवसेनेसाठी २००० कोटींचा सौदा ; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

शिवभक्तांना शिवनेरीवर येण्यापासून मज्जाव का करता? संभाजी राजेंनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले

२०२३ च्या मध्यावर मोदींचा राजीनामा ; न्यायमुर्ती, राजकारणी, उदयगपतींवर ‘पेगासस’ची हेरगिरी

 

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी