29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमुंबईचिंताजनक : भारत पुन्हा हिंदू विकास दराकडे; रघुराम राजन यांचा इशारा

चिंताजनक : भारत पुन्हा हिंदू विकास दराकडे; रघुराम राजन यांचा इशारा

२००३ ते २००८ या कालावधीत सरासरी ९ टक्के असणारा देशाचा विकास दर ६.५ टक्क्यांनजीक येऊन पोहोचला आहे. दिवसेंदिवस महागाईचा निर्देशांक नवनवीन उच्चांक गाठत असून बेरोजगारीच्या प्रमाणातही वाढ होत आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी भारतीय अस्थव्यव्सतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ म्हणजेच भारतातील हिंदू विकास दराविषयी त्यांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. भारताची सध्याचा आर्थिक विकास दर पाहता भारत देश हा हिंदू विकास दराच्या जवळ आला आहे असं रघुराम राजन यांनी म्हटलं आहे. खासगी क्षेत्रातील कमकुवत गुंतवणूक, उच्च व्याज दर, मंदावलेला आर्थिक विकास दर या सर्व गोष्टींचा हा परिणाम असून त्याबाबत राजन यांनी इशारा दिला आहे. राजन यांच्या वक्तव्यामुळे ‘हिंदू ग्रोथ रेट’बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (India back to Hindu growth rate)

‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ काय आहे, जाणून घेऊ या!
हिंदू रेट ऑफ ग्रोथ अर्थशास्त्रातील एक सिद्धांत आहे. हा सिद्धांत कोणत्याही धर्माशी निगडित नसून आर्थिक क्षेत्रात हा शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणावर वापरात आणला जातो. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बहुतांश नागरिक शेतीवर अवबंलून होते. पायाभूत सुविधांची वानवा होती. रस्त्यांचे जाळे अद्याप निर्माण झाले नव्हते. प्रचंड गरिबी होती. मात्र कालांतराने सुधारणा घडत गेल्या. स्वातंत्र्याला ३० वर्षे पूर्ण होईस्तोवर हा ‘ग्रोथ रेट’ बराच कमी झाला होता. या मंदावलेल्या विकास दराविषयी बोलताना १९७८ मध्ये ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ असा शब्दप्रयोग प्रचलित झाला होता.

हा उल्लेख त्यावेळचे प्रसिद्ध प्राध्यापक राज कृष्ण यांनी केला होता. त्यानंतर अर्थशास्त्रज्ञ या नावाचा वापर करू लागले. १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही विकास दर हा ३० वर्षे तसाच होता. हा विकास दर ३.५ टक्के किंवा त्यापेक्षाही खाली होता. त्यामुळे हिंदू वाढीचा दर असा शब्द प्रचलित झाला. १९९१ मध्ये आर्थिक उदारीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर हिंदू विकास दराच्या पुढे देशाचा विकास दर सरकला.

हे सुद्धा वाचा

शिक्षण पद्धतींच्या अदलाबदलीमुळे ब्रिटीश भारतीयांपेक्षा साक्षर; मोहन भागवत

नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर तुमची पिवळी झाली होती; रामदास कदमांचा ठाकरेंना टोला

आठ वर्षांची असल्यापासून वडिलांकडून लैंगिक शोषण; भाजप नेत्या खुशबू सुंदर यांचे स्पष्टीकरण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी