32 C
Mumbai
Tuesday, May 16, 2023
घरमुंबईVEDIO : अ‍ॅव्हेंजर्समधील आयर्नमॅनसारखे हवेत उडून भारतीय जवान शत्रूला करणार नामोहरम..!

VEDIO : अ‍ॅव्हेंजर्समधील आयर्नमॅनसारखे हवेत उडून भारतीय जवान शत्रूला करणार नामोहरम..!

बंगरुळु येथील हवाई दलाच्या येलाहांका तळावर 'एरो इंडिया २०२३' हे पाच दिवसीय हवाई प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १३ ते १७ फेब्रुवारीदरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या शोमध्ये ९८ अधिक देशांतील संरक्षण उत्पादने बनविणाऱ्या कंपन्यांनी भाग घेतला आहे. ३५ हजार चौरस क्षेत्रफळावर हा हवाई तळ आहे. जेटपॅक सूट हा या एअर शोमधील आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. विशेष म्हणजे हा सूट भारताने विकसित केला आहे.

अ‍ॅव्हेंजर्समधल्या ‘आयर्नमॅन’सारखे सामान्य माणसांनादेखील हवेत उडता आले तर काय मजा येईल, असा विचार आपल्या सर्वांच्या मनात कधीतरी डोकावून गेला असेलच… आपली ही इच्छा पूर्ण होईल की नाही माहित नाही पण आपल्या सैन्यदलातील जवानांना मात्र आता स्पायडरमॅन, सुपरमॅन, आयर्नमॅनसारखे नक्कीच हवेत उडता येणार आहे. बंगरुळु येथील हवाई दलाच्या येलाहांका तळावर ‘एरो इंडिया २०२३’ हा पाच दिवसीय हवाई प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या शोमध्ये असा एक जेटपॅक सूट ठेवण्यात आला आहे की जो परिधान केल्यावर माणसालादेखील हवेत उडता येणार आहे. गॅस टर्बाईन इंजिनवर चालणारा हा सूट घातल्यानंतर आपल्या जवानांना १० ते १५ मीटर उंचीवर हवेत उडता येणार आहे. उन्हाळयातील उष्ण वातावरणात तसेच पाऊस आणि थंडीतही या सुटचा वापर करता येईल. हा सूट घालून भारतीय जवानांना शत्रुसैन्याला नामोहरम करणे अधिक सोपे जाईल. (Indian soldier will fly in the air like Ironman in Avengers and attack the enemy)

जेटसूट कसा आहे?
या सुटीचे वजन ४० किलोग्रॅम इतके आहे. हा सूट घालून आपले जवान कधीही उड्डाण करू शकतात तसेच जमिनीवरही उतरू शकतात. ताशी ५० किलोमीटर वेगाने १० ते १५ मीटर उंचीवर आठ मिनिटे उडता येते. कोणत्याही हवामानात या सुटीचा वापर करता येणार आहे. या सूटमध्ये टर्बाईन इंजिन लावण्यात आले आहे. या सुटीचा रिमोट कंट्रोल हातात असणार आहे. त्यामुळे आता सीमेवर टेहळणी करणे, दऱ्याखोऱ्यांत लपून बसलेल्या शत्रूवर नजर ठेवणे आता सोपे होणार आहे. हा सूट परिधान करून शत्रूवर हल्ला करता येत नाही. मात्र, भविष्यात ते तंत्रज्ञानही विकसित केले जाणार आहे. हे सूट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून बंगरुळूमधील के. राघव रेड्डी यावर काम करत आहेत. ‘एरो इंडिया’ २०२३ मध्ये तिन्ही सैन्य दलांसाठी स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित एक विशेष केंद्र उभारण्यात आले आहे. नौदलामार्फतही ड्रोन, पाण्याखालील टेहळणी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानावर अधिक भर देत आहे, असे व्हाइस अ‍ॅडमिरल एस. एन. घोरपडे यांनी सांगितले.

‘एरो इंडिया २०२३’ मध्ये पहिल्यांदाच TAPAS-BH उड्डाण करणार आहे. DRDO ने दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही भारतीय सैन्यदले याचा वापर करू शकतात. भारतीय सैन्यदलाचे तिन्ही विभाग भूदल, हवाई दल आणि नौदल याचा वापर कारणात आहेत. हे ड्रोन २८ हजार फूट उंचीवरून तब्बल १८ तासांपेक्षा अधिक वेळ उड्डाण करू शकते. इतकेच नव्हे, तर ३५० किलोग्रॅम वजनाचे पेलोडही याद्वारे पाठवता येतात. याव्यतिरिक्त DRDOच्या पॅव्हेलियनमध्ये लढाऊ विमाने, यूव्हीए, क्षेपणास्त्र प्रणाली, इंजन एंड प्रपल्शन सिस्टम, हवाई टेहळणी यंत्रणा, सेंसर इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर अँड कम्युनिकेशन सिस्टम यांसारख्या ३३० पेक्षा अधिक उत्पादने प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.

हे सुद्धा वाचा

VIDEO : अदानी गो बॅक, स्टॉप अदानी; हिंडेनबर्ग अहवालानंतर का व्हायरल होताहेत फोटो, व्हिडिओ, जाणून घ्या सत्य

VIDEO : रेल्वे रुळांमध्ये आणि भोवती खडी का असते जाणून घ्यायचेय…

VIDEO : रेणुका ठाकूरने मारलेल्या ‘त्या’ निशाण्यावर पाकिस्तानी खेळाडू घायाळ

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी