33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeमुंबईIndorama Company : चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार, इंडोरामा कंपनीचा विश्वास

Indorama Company : चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार, इंडोरामा कंपनीचा विश्वास

राज्यात बेरोजगारीचे संकट उभे असले तरीही त्या हातांना काम मिळवून देण्यासाठी राज्य सरकार, अनेक कंपन्या पुढाकार घेत असताना दिसतात. या संकटामुळे कौशल्य विकासचे अनेक उपक्रम सुद्धा राबवलेले दिसतात, त्यामुळे अनेक जणांना सहज काम उपलब्ध होते.

राज्यात रोजगार निर्मिती व्हावी, अनेकांच्या हाताला काम मिळावे म्हणून राज्य सरकार वेगवेगळ्या पातळीवरून प्रयत्न करीत असते, इतर उद्योगांना प्रोत्साहन देत असते. इंडोरामा कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उद्योग दरवाढ, रोजगाराविषयी चर्चा केली. यावेळी मागास भागांत रोजगार निर्मिती व्हावी यासाठी उद्योग वाढीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आश्वासन देण्यात आले. रोजगार निर्मितीसाठी ही सदिच्छा भेट असल्याचे या मंडळाकडून यावेळी सांगण्यात आले. इंडोरामा कंपनीच्या माध्यमातून सुमारे चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याने राज्यातील अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे.

इंडोरामा कंपनीचा सध्या नागपूर येथे हा वस्त्रोद्योग सुरू आहे. या वस्त्रोद्योग कंपनीकडून सुमारे चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती करण्यात येणार असून या कंपनी मार्फत राज्यात नव्याने साडेचार हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. आता नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर येथे वस्त्रोद्योगाशी निगडीत व्यवसायात नवी गुंतवणूक प्रस्तावित आहे, तेथे तीन ते चार वर्षात टप्प्या टप्प्याने ही गुंतवणूक केली जाणार आहे.

 हे सुद्धा वाचा…

Shiv Sena : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घेणार गटप्रमुखांचा मेळावा

VIDEO : निर्जीव मूर्तीला सजीव करणारे ‘डोळे’

Mamata Banerjee : मला अटक करुन दाखवा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे भाजपला खुले आव्हान

सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या या बैठकीत शिष्टमंडळात इंडोरामा चे व्यवस्थापकीय संचालक विशाल लोहीया, मुख्य कार्यकारी अधीकारी सुधिंद्र राव उपस्थित होते. यावेळी श्री लोहीया यांनी मुख्यमंत्री श्री शिंदे यांना पुष्पगुच्छ, शाल आणि स्मरणचिन्ह देऊन सन्मानित केले.

दरम्यान, राज्यात बेरोजगारीचे संकट उभे असले तरीही त्या हातांना काम मिळवून देण्यासाठी राज्य सरकार, अनेक कंपन्या पुढाकार घेत असताना दिसतात. या संकटामुळे कौशल्य विकासचे अनेक उपक्रम सुद्धा राबवलेले दिसतात, त्यामुळे अनेक जणांना सहज काम उपलब्ध होते. अनेकदा बेरोजगारीच्या मुद्यावरून राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करीत असल्याचे पाहायला मिळते परंतु राज्यात अनेक गुंतवणूक आणण्याकडे सुद्धा तेवढाच कल असल्याचे पाहायला मिळते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी