34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeमुंबईDahihandi Insurance 2022 : गोविंदांना मुंबई भाजपकडून 10 लाखांचे विमा कवच जाहीर

Dahihandi Insurance 2022 : गोविंदांना मुंबई भाजपकडून 10 लाखांचे विमा कवच जाहीर

दहीहंडीच्या दिवशी नवनिर्वाचित राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी जोमाने गोविंदांकडून सराव करण्यात येत आहे. आता गोविंदांना मुंबई भाजपकडून आणखी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे.

गोपाळकाला हा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या वर्षी दहीहंडीचा सण हा कोणत्याही नियमांशिवाय साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. इतकेच नाही तर दहीहंडीच्या दिवशी नवनिर्वाचित राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी जोमाने गोविंदांकडून सराव करण्यात येत आहे. आता गोविंदांना मुंबई भाजपकडून आणखी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. दहिहंडीमध्ये थर रचताना अनेक गोविंदा पडून जखमी होतात, याच पार्श्वभूमीवर गोविंदांना मुंबई भाजपकडून 10 लाख रुपयांचे विमा (Insurance) कवच देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती कॅबिनेट मंत्री, मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडून देण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे राज्यात दहीहंडी साजरी केली गेली नाही. पण यंदाच्या वर्षी मात्र गोविंदांकडून दोन वर्षाची कसर भरून काढण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी दहिहंडीतील थरांवर कोणतेच निर्बंध लावण्यात आलेले नाही. म्हणजेच यावर्षी निर्बंधमुक्त दहीहंडी साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे गोविंदांमध्ये एक वेगळाच उत्साह दहीहंडीचा सराव करताना दिसून येत आहे.

Azadi ka Amrit Mahotsav : आरटीओकडून अनोखी ‘तिरंगा रॅली’

Azadi Ka Amrit Mahotsav : तुरूंगातील कैद्यांसाठी महाराष्ट्र सरकारचा भन्नाट कार्यक्रम

Azadi ka Amrit Mahotsav: सैनिकांना तिरंगा राखी पाठवा, सरकारचे आवाहन

दहीहंडीच्या दिवशी गोविंदा पथकाकडून उंचचउंच मनोरे रचण्यात येतात. यावेळी बहुतांश गोविंदा थरांवरून खाली कोसळून जखमी होतात. यामध्ये काही वेळेस गोविंदांचा अपघाती मृत्यू सुद्धा होतो. त्यामुळे गोविंदांच्या घरच्यांना मदत मिळावी, यासाठी मुंबई भाजपकडून गोविंदांसाठी विमा सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या आणि दहीहंडीत अपघाती मृत्यू झालेल्या गोविंदाच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात येणार आहे. तर जखमी गोविंदांच्या रुग्णालयातील खर्चासाठी एक लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच देण्यात येणार आहे, हा विमा 19 ऑगस्ट या संपूर्ण दिवसभरासाठी असेल, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई भाजपकडून देण्यात येणाऱ्या सुरक्षा विमा कवच योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदा पथकांना त्यांच्या पथकाच्या मंडळाच्या लेटरहेडवर गोविंदांची नावे आणि त्यांचे वय नमूद करून ते लेटर दादर येथील वसंत स्मृती येथील भाजप कार्यालयात जमा करावे, असे आवाहन मुंबई भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या योजनेचा लाभ अधिकाधिक गोविंदांनी घ्यावा, असेही मंगलप्रभात लोढा यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी