28 C
Mumbai
Friday, January 27, 2023
घरमुंबईभविष्यात मुंबईत श्वास घेणे होईल कठीण; तज्ज्ञांनी दिला इशारा

भविष्यात मुंबईत श्वास घेणे होईल कठीण; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईकरांना पर्यावरण तज्ज्ञांकडून इशारा देण्यात आला आहे. हा इशारा हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये हवेची ढासळत चाललेली गुणवत्ता यामुळे देण्यात आला आहे. येत्या काही वर्षांत मुंबईची हवा आणखी दूषित होऊ शकते, असा इशारा हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

आगामी काळात मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळण्याची चिंता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. येत्या काळात मुंबईची हवा आणखी खराब होऊ शकते, अशी माहिती हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) चे संस्थापक आणि नियोजन संचालक डॉ. गुफ्रान बेग म्हणाले की, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मुंबई आणि पश्चिम भारतातील इतर भागांमध्ये वायू प्रदूषण अपवादात्मकपणे जास्त असते यात शंका नाही. मुंबईत सध्या प्रदूषण वाढले आहे. मुंबईला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेले असल्याकारणाने हवेतील प्रदूषण रोखण्यास मदत होत हुती. परंतु आता हवेची गुणवत्ता ढासळल्याने आणि हवा दूषित झाल्याने येत्या काही वर्षात मुंबईतील हवा आणखी दूषित होऊ शकते.

दरम्यान, आत्मनिर्भर फाऊंडेशनचे संस्थापक भगवान केसभट म्हणाले की, मुंबईकरांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार आणि स्थानिक प्राधिकरणांनी मुंबईसाठी ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन तयार करणे आवश्यक आहे.

प्रदूषण कमी करण्याचे मार्ग
ग्रैप ही विशिष्ट प्रणाली आहे. ज्याचा वापर शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी केला जातो. परंतु हे तेव्हाच तपासले जाऊ शकते जेव्हा हवेची गुणवत्ता एका विशिष्ट चौकटीत असते. तसेच मुंबईकरांचे आरोग्य लक्षात घेऊन तातडीने आरोग्य सूचना देण्याची गरज आहे. बांधकाम क्षेत्र, उद्योग उत्सर्जन आणि वाहतूक क्षेत्र या सर्वांसाठी कठोर मानके आणि अचूक प्रणालींचे पालन करणे आवश्यक आहे. याशिवाय, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मुंबई (एमएमआर) आणि इतर भागांचे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक धोरणामध्ये समावेश करावा.

मुंबईतील प्रदूषणाची स्थिती
मुंबईत डिसेंबरच्या पहिल्या 10 दिवसांपैकी 4 दिवस हवेची गुणवत्ता ढासळली होती. परंतु चांगली गोष्ट अशी आहे की, मांडूस चक्रीवादळानंतर येत्या काही दिवसांत शहरातील वायू प्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे आणि मुंबईत वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. मालाड, चेंबूर आणि माझगाव ही उपनगरे 1 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान मुंबईतील तीन सर्वाधिक प्रदूषित क्षेत्रे होती, तर बोरिवली, नवी मुंबई आणि वरळी येथे या कालावधीत सर्वात स्वच्छ हवा होती.

हे सुद्धा वाचा

राज कुंद्रा, शर्लिन चोप्रा, पूनम पांडेला पोर्नोग्राफी प्रकरणात दिलासा

हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंत चालणार; तीन वर्षांनंतर नागपुरात कामकाज!

“भुरा”कार शरद बाविस्कर यांनी नाकारला राज्य सरकारचा वाङमय पुरस्कार

गेल्या 40 दिवसांत म्हणजेच 1 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत मुंबईत हवेच्या गुणवत्तेसाठी ‘खराब’ आणि ‘अत्यंत खराब’ या दोन श्रेणींमध्ये 22 दिवस नोंदविण्यात आले आहेत. या 22 दिवसांपैकी चार दिवसांत (5, 6, 7 आणि 8 डिसेंबर) मुंबईतील एकूण हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत राहिली आहे. तर, 2021 मध्ये (1 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या याच कालावधीत) खराब दिवसांची संख्या एकूण 6 होती, तर हवेच्या गुणवत्तेचे दिवस हे फारसे खराब नव्हते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!