33 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमुंबईJacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसला कोर्टाकडून दिलासा नाहीच

Jacqueline Fernandez : जॅकलिन फर्नांडिसला कोर्टाकडून दिलासा नाहीच

सुकेश चंद्रशेखर याच्यावर मनी लाॅंन्ड्रींगचे आरोप करण्यात आले आहेत. 200 कोटींहून अधिक पैशाची उधळपट्टी केल्याचे उघडकीस आल्यानंतर ईडी कडून सदर कारवाई करण्यात आली आहे. पटियाला हाउस कोर्टात ही केस सुरू आहे. याप्रकरणी आता जॅकलिनचे सुद्धा नाव जोडले गेले आहे.

बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुकेश चंद्रशेखरबरोबर असलेल्या रिलेशनमुळे जॅकलिन पुरती या प्रकरणी अडकली आहे. सुकेश चंद्रशेखर याने तब्बल 200 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप करत ईडीने धाड टाकत त्याची आतापर्यंत ७ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी तपास केला असता सुकेशने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्याचे उघडकीस आले आहे, त्यामुळे आपोआपच या प्रकरणी जॅकलीनचे नाव जोडले गेले आहे. याबाबत कोर्टाकडून जॅकलिनला कोणताच दिलासा मिळाला नसून तिला 26 सप्टेंबर 2022 रोजी कोर्टात हजर राहायचे आदेश दिले आहेत.

सुकेश चंद्रशेखर याच्यावर मनी लाॅंन्ड्रींगचे आरोप करण्यात आले आहेत. 200 कोटींहून अधिक पैशाची उधळपट्टी केल्याचे उघडकीस आल्यानंतर ईडी कडून सदर कारवाई करण्यात आली आहे. पटियाला हाउस कोर्टात ही केस सुरू आहे. यावेळी सुकेशला जॅकलिन भेटत असल्याचे सुकेशची सहकारी पिंकी इराणीने म्हटले आहे, तसेच तिच्या साहाय्याने सुकेश जॅकलिनला महागड्या भेटवस्तू देत असल्याचा आरोप सुद्धा पिंकी इराणीने केला आहे, त्यामुळे या प्रकरणावरील सप्लिमेंट्री चार्जशीटवर विचार केला असून आता जॅकलीनला 26 सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा…

Department of Archaeology : ऐन गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 5 हजार वर्षे जुन्या गणेश मंदिरात पुरातत्त्व विभागाने केली तोडफोड

Trupti Sandbhor : नांदेड वाघाला मनपाच्या आयुक्तपदी तृप्ती सांडभोर यांची नवनियुक्ती

Ramraje Naik Nimbalkar : जयकुमार गोरे यांच्यामुळे माणमधील औद्योगिक कॉरिडॉर कोरेगावला स्थलांतरीत झाला, रामराजे नाईक निंबाळकर यांचा गंभीर आरोप

याआधी सोशल मीडियावर जॅकलिनसोबतचे फोटो पोस्ट करत सुकेशने तिला गर्लफ्रेंड असल्याचे म्हटले होते, परंतु यावर जॅकलिनने काहीच स्पष्टीकरण दिले नव्हते. या प्रकरणावर बोलताना जॅकलिन म्हणाली, जेव्हा सुकेशशी संपर्क साधला तेव्हा त्याने स्वतःची सन टीव्हीचा मालक म्हणून ओळख करून दिली, शिवाय आपण जयललिता यांच्या राजकीय कुटुंबातील असून तो चेन्नईचा असल्याचेही त्यांनी सांगितले. जॅकलिन पुढे म्हणाली, सुकेश म्हणाला होता की तो माझा खूप मोठा चाहता आहे, आणि मी दाक्षिणात्य चित्रपट करावेत आणि सन टीव्हीच्या रूपाने त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. तेव्हापासून दोघेही संपर्कात आले होतो असे म्हणून तिने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी