30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमुंबईसमाजाप्रती जैन समाजाची लोककल्याणकारी भावना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार 

समाजाप्रती जैन समाजाची लोककल्याणकारी भावना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार 

जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकटप्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. राष्ट्रसंत परमपूज्य श्री नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज यांना आचार्य पद प्रदान महा-महोत्सव कार्यक्रमावेळी ते बोलत होते. (Jain community:Tributes from Chief Minister Eknath Shinde)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य सरकारने नुकताच राज्याचा अर्थसंकल्प घोषित केला असून यात सर्व लोकांच्या प्रगती आणि उन्नतीचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात गो-सेवा आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राष्ट्रसंत नयपद्मसागरजी आणि प्रशांतसागरजी यांना आचार्य पदवी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाकडून त्यांचे अभिनंदन केले.

त्याचप्रमाणे या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू बाबा रामदेव तसेच देश-विदेशातील संत आणि जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस, पालकमंत्री श्री.लोढा, योगगुरू रामदेव यांच्या हस्ते महान मंगल ग्रंथाचे प्रकाशन देखील करण्यात आले.

याप्रसंगी आज राष्ट्रसंत नयपद्मसागरजी यांना प्रदान करण्यात आचार्य ही पदवी असली तरी हे पद एक तपश्चर्या आहे. आचार्य बनण्यासाठी एक तप करावे लागते. या पदावर पोहोचल्यानंतर कोटी कोटी जनतेच्या आशा-आकांशांना आशीर्वाद द्यावा लागतो. हे काम अविरत सुरू राहणार, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा :

शिंदे-फडणवीस सरकार कृषि खात्यातल्या बदल्या, पदोन्नती आणि भरतीमध्ये अडकलंय; अजित पवार यांचा घणाघात

राज्यभरात उद्यानांमधून उलगडणार शिवचरित्र! शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा

ठाकरेंच्या ‘जीभ हासडून टाकू’ला एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

फडणवीस पुढे म्हणाले की, नयपद्मसागरजी एक संत नसून एक विचार आहे. ते समाजाला संघटित करून पुढे नेत आहेत. ते धर्मासोबतच लोकांना राष्ट्रभक्ती सुद्धा शिकवत आहे. आपल्या समाजातील सर्व लोकांना ते योग्य वाटेने जाण्याचे मार्गदर्शन नवपद्मसागरजी यांच्याकडून मिळावे, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी