29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
HomeमुंबईJitendra Awhad Bail : जितेंद्र आव्हाड तुरूंगाबाहेर, जामीन मंजूर; फडणवीस काय म्हणाले?

Jitendra Awhad Bail : जितेंद्र आव्हाड तुरूंगाबाहेर, जामीन मंजूर; फडणवीस काय म्हणाले?

हर हर महादेव' चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी ठाण्यातील चित्रपटगृहात राडा करत, प्रेक्षकांना मारहाण केल्याच्या आरोपामुळे जितेंद्र आव्हाड यांना काल अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयता हजर केले असता आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आव्हाड यांच्यातर्फे जामीन अर्ज केल्यानंतर त्यांना 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

‘हर हर महादेव’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी ठाण्यातील चित्रपटगृहात राडा करत, प्रेक्षकांना मारहाण केल्याच्या आरोपामुळे जितेंद्र आव्हाड यांना काल अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयता हजर केले असता आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आव्हाड यांच्यातर्फे जामीन अर्ज केल्यानंतर त्यांना 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये केलेली मारहाण राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना चांगलीत भोवली. काल आव्हाडांना वर्तक पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे.

काल जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती. या प्रक्रियेला वेळ लागल्याने त्यांना आज सकाळी कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर आज त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आव्हाड यांना जामीन मिळाल्यानंतर ठाणे कोर्टाच्या समोर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विटरवर ‘जामीन मिळाला’ अशी पोस्ट शेअर केली.

सध्या हर हर महादेव हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर इतिहास अभ्यासंकांनी या चित्रपटात इतिहासाची मोडतोड झाल्याचा आरोप केला होता. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी देखील या चित्रपटात इतिहासाची मोडतोड झाली असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉल मधील चित्रपटगृहात येऊन हा चित्रपट बंद करण्याचा प्रयत्न केला असता, येथे मोठा गोँधळ झाला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील तेथे गोंधळ घातल्याचा आरोप होत आहे. यावळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मारहाण झाल्याची तक्रार देखील पोलिसांत दाखल झाली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासह जवळपास 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आव्हाड यांना काल पोलिसांनी अटक केली होती.
हे सुद्धा वाचा :
Maharashtra Politics : वडील शिंदे गटात तर मुलगा म्हणतो मी ठाकरेंसोबतच

Explosive Found In River : रायगडमधील नदीत जिलेटिनच्या काठ्या आढळल्याने खळबळ

IND vs NZ : टी20 विश्वचषक संपताच राहुल द्रविडला ब्रेक! व्ही व्ही एस लक्ष्मण प्रशिक्षकपदी विराजमान

दरम्यान काल पोलिसांवर माझ्या अटक करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आव्हाडांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. फडणवीस म्हणाले, ” जितेंद्र आव्हाड यांची एखाद्या गोष्टीचा कांगावा करण्याची स्टाईल आहे. ते कोणत्याही गोष्टीचे उद्दात्तीकरण करण्याची सवय आहे. त्यांनी चित्रपटगृहात कार्यकर्त्यांसोबत जावून तमाशा केला हे सगळ्यांनी माहिती आहे. त्यामुळेच आव्हाडांना अटक झाली होती. कोणीही कायदा हातात घेतला असता तर अशीच कारवाई झाली असती, पण आव्हाडांना आपण खुप काही मोठ केलयं हे दाखविणयाच्या नादात या सगळ्या गोष्टी घडल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी