33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
HomeमुंबईJitendr Awhad : जितेंद्र आव्हाड प्रकरणात रुपाली चाकणकर अॅक्शन मोडमध्ये; ठाणे पोलिस...

Jitendr Awhad : जितेंद्र आव्हाड प्रकरणात रुपाली चाकणकर अॅक्शन मोडमध्ये; ठाणे पोलिस आयुक्तांना राज्य महिला आयोगाचे पत्र

जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी राज्य महिला आयोगाकडे धाव घेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर कलम 354चा खोटा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दबाव तंत्र वापरून दाखल केला असून हा गुन्हा रद्द करुन खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी असा तक्रार अर्ज दाखल केला आहे.

एका महिलेच्या तक्रारीवरुन राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोलिसांनी कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी राज्य महिला आयोगाकडे धाव घेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर कलम 354चा खोटा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दबाव तंत्र वापरून दाखल केला असून हा गुन्हा रद्द करुन खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी असा तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार महिला आयोगाने ठाणे पोलिस आयुक्तांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटव्दारे दिली आहे.

ठाणे शहर पोलिस आयुक्तांना महिला आयोगाने पाठवेलल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास ऋता जितेंद्र आव्हाड यांचा अर्ज प्राप्त झाला आहे. आपल्या संदर्भासाठी सोबत अर्जाची प्रत जोडली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरिद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीने दाखल केलेला गुन्हा हा राजकीय सुडबुद्धीने दबवतंत्र वापरून केला असल्याने हा गुन्हा रद्द करण्यात यावा आणि फिर्यादी महिलेवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून कायदेशीर कारवाई करावी, असे अर्जदाराने म्हटले आहे. या प्रकरणी फिर्यादीने दाखल केलेला गुन्हा आणि परस्परविरोधात मिळालेले अर्ज दोन्हींबाबतची सत्यता पडताळून वस्तुस्थिती दर्शक अहवाल राज्य महिला आयोगाकडे सादर करावा, असे या पत्रात म्हटले आहे.

ठाण्यातील कळवा पूलाचे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर गर्दीतून बाहेर पडत असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप एका महिलेने केला, तसेच याबाबत पोलिसांत देखील तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
हे सुद्धा वाचा :

Eknath Shinde : आव्हाडांनी कायदा हातात घेऊ नये, सुडभावनेतून कोणतीही कारवाई होणार नाही; मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया

Video : जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनात उभ्या राहिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या

Video : जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनात उभ्या राहिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपल्यावर कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलीसी अत्याचाराविरोधात लढणार.. तसेच मी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे द्खील ट्विट केले होते. त्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. तसेच पक्षातील नेत्यांनी देखील आव्हाड यांच्यावरील कारवाई चुकीच्यापद्धतीची असल्याने त्यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची देखील मागणी केली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी