33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
HomeमुंबईEknath Shinde : आव्हाडांनी कायदा हातात घेऊ नये, सुडभावनेतून कोणतीही कारवाई होणार...

Eknath Shinde : आव्हाडांनी कायदा हातात घेऊ नये, सुडभावनेतून कोणतीही कारवाई होणार नाही; मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांनी यांनी मुख्यमंत्र्याचा पाच दहा फुट अंतरावर ही घटना घडली होती, त्यांनी याप्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी केली होती.

राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांनी यांनी मुख्यमंत्र्याचा पाच दहा फुट अंतरावर ही घटना घडली होती, त्यांनी याप्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी केली होती. दरम्यान या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पीडित महिलेच्या तक्रारीनुसारच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे सरकार कायद्याने चालणारे आहे. सुडभावनेतून कोणतीही कारवाई होणार नाही. पोलिस नियमानुसारच कारवाई करतील. आव्हाडांनी कायदा हातात घेऊ नये असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

बाल दिनानिमित्त आज मुख्यमंत्री शिंदे परळच्या शिरोडकर शाळेत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिला की नाही याची मला माहिती नाही, पण याप्रकरणी पोलिस कायद्यानुसार चौकशी करतील आम्ही सुडाने कोणतीही कारवाई करत नाही. ठाण्यातील कळवा पूलाचे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर गर्दीतून बाहेर पडत असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप एका महिलेने केला, तसेच याबाबत पोलिसांत देखील तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आपल्यावर कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलीसी अत्याचाराविरोधात लढणार.. तसेच मी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे द्खील ट्विट केले होते. त्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. तसेच पक्षातील नेत्यांनी देखील आव्हाड यांच्यावरील कारवाई चुकीच्यापद्धतीची असल्याने त्यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची देखील मागणी केली होती. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदार संघात देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार निदर्शने केली.

हे सुद्धा वाचा:
Video : जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनात उभ्या राहिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या

Video : IAS घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्याचा दणकट उपक्रम

Delhi Murder : दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या; त्यानं मात्र तिच्या शरिराचे 35 तुकडे केले

दरम्यान दुपारी आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू माध्यमांसमोर मांडली. यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचे मला वाईट वाटले. माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असता तरी एकवेळ ते चालले असते मात्र माझी सामाजिक प्रतिष्ठा कमी करण्यासाठीच माझ्याविरोधात हे षडयंत्र रचल्याचे यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी