30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमुंबईदिवाळीत म्हाडाच्या तीन हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार : जितेंद्र आव्हाड

दिवाळीत म्हाडाच्या तीन हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार : जितेंद्र आव्हाड

टीम लय भारी: 

मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिवाळीत म्हाडाच्या तब्बल 3 हजार घरांची सोडत निघणार अशी घोषणा केली आहे. यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, ‘पहाडी गोरेगाव,मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली लवकरच हे काम पुर्ण होऊन या सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील. यावेळी म्हाडाचे सर्व  प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल’ Jitendra Awhad MHADA to take out lottery

आपल्या हक्काचं घर मिळावं असं प्रत्येकाला वाटतं असतं. दिवसागणिक मुंबईतल्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहे. म्हाडाच्या गृहप्रकल्प योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना मुंबईत आपलं घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मदत मिळते.

म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांच्या सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आलीय. गृहनिर्माण विभागानं यासंबंधीचा शासन निर्णय जारी केलाय. म्हाडा सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च असे उत्पन्न गट आहेत. या उत्पन्न गटासाठी विशिष्ट उत्पन्न मर्यादाही निश्चित करण्यात आलीय. या उत्पन्न मर्यादेनुसार इच्छुकांना सोडतीत अर्ज भरत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करता येतं.

हे सुद्धा वाचा: 

काश्मीरमधील हत्यासत्रावर ‘काश्मीर फाईल्स २’ काढावा : संजय राऊत

After Sonia, Priyanka Gandhi Tests Covid Positive, Reports Mild Symptoms

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी