31 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeमुंबईJitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी थोपटले दंड, मोठे आंदोलन उभारण्याची तयारी

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी थोपटले दंड, मोठे आंदोलन उभारण्याची तयारी

जितेंद्र आव्हाडांनी उठवलेला हा आवाज मुंब्रा-कळव्यात राहणाऱ्या नागरिकांना नक्कीच फायदेशीर ठरणार असून नागरिक सुद्धा त्यांच्या परीने या प्रश्नावर कसा मार्ग काढणार हे सुद्धा लवकरच पाहायला मिळेल, त्यामुळे मध्य रेल्वेने तातडीने यावर पाऊले उटलणे आता गरजेचे आहे. 

मुंबईची लाईफलाईन अशी ‘लोकल’ची ओळख. लोकल सेवेमुळे असंख्य नागरिक घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे धावाधाव करीत आपल्या इच्छित स्थळी वेळेत पोहोचत असतात. परंतु ज्या वेळी ही लोकलव्यवस्थेत काही कारणास्तव खोळंबा होतो, तेव्हा मात्र नागरिक हतबल होत इतर पर्यायाकडे वळतात, परंतु सहज, सुलभ, कमी खर्चात परवडणारी लोकल सुविधेचा लाभ हवा म्हणून केलेला हट्ट मात्र कमी झालेला पाहायला मिळत नाही. मुंब्रा कळव्यात सुद्धा असेच काहीसे घडले असून येथील 21 लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहे, त्यामुळे स्टेशनवर सध्या तुडूंब गर्दी बघायला मिळत आहे. या गर्दीमुळे नागरिक मेटाकूटीस आले असल्याचा मुद्दा उपस्थित करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सुद्धा या विषयाकडे लक्ष वेधून घेतले आहे. 

लोकलफेऱ्यांच्या या उद्भवलेल्या प्रश्नाबाबत राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मिडीयाच्या माध्यातून तीव्र निषेध व्यक्त करीत यावर गंभीर नोंद घेण्याचे सूचवले आहे. ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड लिहितात, मुंब्रा-कळव्याला थांबणाऱ्या 21 लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच्यात AC लोकलची भर पडली आहे.त्यामुळे गर्दीच्या वेळेस स्टेशवर उभे राहायला देखील जागा नसते.@Central_Railway ह्यांनी ह्या प्रकरणाची गंभीर नोंद घ्यावी. प्रकरण हाताच्या बाहेर जाईल अशी परिस्थिती निर्माण होत आहे, असे म्हणून यावर तातडीने पर्यायी व्यवस्था सुरू करण्याविषयी सुचवले असून यात मध्य रेल्वेला टॅग केले आहे.

हे सुद्धा वाचा…

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोरगरीबांचे कैवारी वाटतात का ? जाणून घ्या सामान्य लोकांच्या इरसाल प्रतिक्रिया

Eknath Shinde : एकनाथ शिंदे सत्तेत आले अन् राज्याचे 3 हजार कोटींचे नुकसान झाले !

Arvind Kejriwal : …तर गुजरातमध्ये ‘आप’ची सत्ता येणार, केजरीवाल यांचा दावा

याबाबत आव्हाड यांनी रेल्वे प्रवाशांनो एक व्हा असा आशयाचे पोस्टर सुद्धा पोस्ट केले आहे. त्यावर डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थित मुंब्रा रेल्वे स्टेशन येथे रेल्वे प्रवाशांची बैठक असे सुद्धा म्हटले आहे. सदर बैठर 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमका कोणता निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लोकल प्रवाशांना प्रवासात उगाचच गैरसोय होऊ नये म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी आता त्यांचे दंड थोपटले असून ते मोठे आंदोलन उभारणार का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी उठवलेला हा आवाज मुंब्रा-कळव्यात राहणाऱ्या नागरिकांना नक्कीच फायदेशीर ठरणार असून नागरिक सुद्धा त्यांच्या परीने या प्रश्नावर कसा मार्ग काढणार हे सुद्धा लवकरच पाहायला मिळेल, त्यामुळे मध्य रेल्वेने तातडीने यावर पाऊले उटलणे आता गरजेचे आहे. 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी