28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईअखेर दोन वर्षानंतर काळा घोडा सज्ज; लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद

अखेर दोन वर्षानंतर काळा घोडा सज्ज; लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद

कोरोना महामारीमुळे गेली २ वर्ष आपल्याला सण-उत्सव उत्साहाने साजरे करता आले नाहीत; मात्र गतवर्षात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यापासून गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम हे सण जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात साजरे करण्यात आले. यंदाही मुंबईच्या सुप्रसिद्ध फेस्टिवलपैकी एक म्हणजे काळा घोडा परिसरातील स्ट्रीटवर ‘काळा घोडा कला महोत्सवा’ला सुरुवात झाली आहे. (KGAF 2023 : After two years the Kala Ghoda is ready; Spontaneous responses from children to the elderly)

मुंबईतील काला घोडा फेस्टिव्हल (Kala Ghoda Festival) हा सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव म्हणुन ओळखला. या महोत्सवात चित्रपट, नाटक, नृत्य, आणि संगीत कला असे विविध स्टॉल नागरिकांसाठी उपलब्ध असतात. या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे कलाकार आणि नवदित कलाकारांना आपली कला सादरीकरण व्यासपीठ उपलब्ध होते. उत्सव हा महोत्सव 04 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी पर्यंत सुरू असून या महोत्सवात खाद्यार्थसह विविध वस्तु, पुस्तक, शोभेच्या संस्थांचे सुमारे ८० स्टॉल ग्रथपद आले आहेत. या महोत्सवात कलावंतांनी अनेक कला सादर केल्या आहेत. त्या पाहण्यासाठी आपण आवर्जून या महोत्सवाला भेट द्यावी आणि या कलाकृतींचा आनंद लुटवा. मुख्यतः येथे प्रवेश विनामूल्य आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काळा घोडा कला महोत्सवाला शेकडो पर्यटकांनी पहिल्याच दिवशी भेट दिली आहे. विविध कलाकृतींचा आस्वाद घेताना आणि त्यांच्यासोबत फोटो काढताना कलाप्रेमी हरवून जात आहेत. विशेषतः या कला महोत्सवात अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे मात्र त्यातही तरुण आणि तरुणींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या महोत्सवाला लाभतो आहे 12 फेब्रुवारी पर्यंत असलेल्या या महोत्सवाला उद्यापासून आणखी गर्दी होण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे.

काळा घोडा असोसिएशनच्या अध्यक्षा वृंदा मिलर यांनी म्हटले की, “सामुदायिक सहकार्यातून काय साध्य केले जाऊ शकते याचे काळा घोडा कला महोत्सव हे एक जिवंत उदाहरण आहे. हा लोकांसाठी आणि लोकांचा उत्सव आहे. शहराचा लाडका सण दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा मैदानात उतरणार आहे. याबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. या काळात बरेच काही बदलले आहे आणि आमची यंदाची थीम ही भविष्यातील उत्सवाची रचना करताना आमच्या २२ वर्षांच्या वारशाचा संदेश आहे. हे निष्क्रियतेच्या कालखंडापासून सकारात्मकता, बदल आणि प्रगतीच्या युगापर्यंत हळूहळू उदयास येण्याचे सूचक आहे.

दरवर्षी हा उत्सव शक्य करण्यासाठी देशभरातील व्यक्ती आणि उद्योग एकत्र येतात आणि हे वर्षही वेगळे नाही. हा उत्सव, दरवर्षी, काळा घोडा असोसिएशनला त्यांच्या वर्षभराच्या पुनर्संचयित प्रकल्पांसाठी निधी उभारण्यास मदत करतो जे संपूर्ण परिसरात केले जातात. आमच्याकडे काही अतिशय उत्साहवर्धक भागीदार आहेत जे या वर्षी उत्सवाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत आणि काला घोडा पुन्हा एकदा कॅंटरवर सुरू करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.” असे अध्यक्षा मिलर म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा : ‘काळा घोडा कला महोत्सवा’ला मुंबई उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; अल्पोपहार स्टॉल्सना मात्र ‘नो एन्ट्री’

Republic day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे खास डूडल; पाहा गुजरातच्या देशप्रेमीची कलाकृती

VIDEO : चित्र रेखाटत कला शिक्षकाने वाहिली पंतप्रधान मोदींच्या आईला श्रद्धांजली

काळा घोडा कला महोत्सव 2023 थीम
KGAF 2023 ची थीम ‘भूतकाळ फॉरवर्ड’ आहे, जी KGAF 2023 च्या नऊ दिवसांच्या विस्तृत कार्यक्रम आणि कार्यशाळांमध्ये दाखविले जाईल. ज्यामध्ये संगीत, नृत्य, व्हिज्युअल आर्ट्स, थिएटर, सिनेमा, साहित्य, खाद्य, शहरी डिझाइन, आर्किटेक्चर, कॉमेडी, स्ट्रीट आर्ट आणि बरेच काही अशा एकूण 14 पद्धतींचा समावेश असेल. हे कार्यक्रम काला घोडाच्या काही प्रतिष्ठित ठिकाणी आयोजित केले जातील.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी