29 C
Mumbai
Saturday, September 2, 2023
घरमुंबईKirit Somaiya : किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड !

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच मंत्रीमडळच्या बैठकीत मेट्रो कारशेड आरेमध्येच होईल असे स्पष्ट केले होते. मात्र पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पालासाठी मोठया प्रमाणात झाडांची कत्तल झाल्याचा आरोप केला होता.

काही वर्षांपासून मुंबईमधील मेट्रोचे आरे कारशेडचे प्रकरण गाजत आहे. महाविकास आघाडीचे सरकार असतांना या प्रकल्पाला विरोध झाला होता. त्यानंतर कारशेड कांजूर मार्गला नेण्याचे निश्चित झाले होते. मात्र आता एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर हा प्रकल्प पुन्हा आरेमध्येच होणार असल्याचा निर्णय घेतला आहे. याला गेल्या अनेक दिवसांपासून विरोध होत होता. मेट्रो प्रकल्प हा आरेमध्येच व्हावा यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा खूप आग्रह होता. त्यांनी  व्हीडीओ प्रसार‍ित करुन आरेमध्ये मेट्रो कारशेड होणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी ते म्हणाले की,आरे कारशेड मुंबई मेट्राच्या कामाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालायाने इन्कार केला आहे.

काही विघ्नसंतोषी लोकांनी पर्यावरणाच्या नावाने मुंबई मेट्रोचे काम बंद पाडले होते. 12 नोव्हेंबर 2019 मध्ये कामाला स्थगिती दिली होती. आता नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत मेट्रो या मार्गावरुन धावायला लागेल. असे किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री होते. त्यावेळी त्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता.

हे सुद्धा वाचा

Azadi ka Amrut Mahotsav : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष विद्यार्थ्यांच्या, नागरिकांच्या ‘उपेक्षां’नी होणार साजरे

Kanumata Festival : खान्देशात कानुमातेच्या उत्सवाचा जल्लोष, उद्या होणार विसर्जन

Video : ‘सूर नवा, ध्यास नवा’च्या स्पर्धकांना मिळाली सुवर्णसंधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच मंत्रीमडळच्या बैठकीत मेट्रो कारशेड आरेमध्येच होईल असे स्पष्ट केले होते. मात्र पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पासाठी मोठया प्रमाणात झाडांची कत्तल झाल्याचा आरोप केला होता. याव ‘रेल कार्पोरेशन’ने कोणत्याही प्रकारची झाडे तोडली नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आरेच्या जंगलात झाडे तोडण्यास सुरूवात झाली आहे, असा आरोप वकील चंदर उदयसिंग यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालायात  याचिका दाखल करण्यात आली होती.

मात्र 2019 पासून एकही झाडं तोडले नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. ‘एमएमआरसीएल’ने स्पष्ट केले आहे की, काही प्रमाणात झाडांची छाटणी करण्यात आली असून, तण काढून टाकण्यात आले, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. मुंबई ‘रेल कार्पोरेशन’ लिमिटेडच्या वतीने तुषार मेहता यांनी बाजू मांडली. सरकार बदलानंतर आरे मुंबईची मिठागरे, नदीक्षेत्रातील, विकास, पाणथळ क्षेत्र, नाणार, वाढवण बंदी प्रकल्प, बुलेट ट्रेन या सगळया प्रकल्पांच्या नावाखाली मुंबईपासून कोकणापर्यंतचे पर्यावरण धोक्यात आणू नये, अशी पर्यावरण प्रेमींची मागणी आहे. यापूर्वी फडणवीस सरकारने मेट्रो कारशेड आरेमध्ये व्हावे, यासाठी रात्रीच्या वेळी झाडे तोडण्याचा निर्णय घेतला होता. अनेक पर्यावरण प्रेमींनी आंदोलने करुन विरोध केला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी