29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeमुंबईKokan Festival : मुलुंडमध्ये बुधवारपासून अस्सल कोकणी संस्कृतीचा 'कोकण महोत्सव'

Kokan Festival : मुलुंडमध्ये बुधवारपासून अस्सल कोकणी संस्कृतीचा ‘कोकण महोत्सव’

अस्सल कोकणी संस्कृतीचा 'कोकण महोत्सव 2022' मुलुंडमध्ये होत असून या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचा भरगच्च कार्यक्रम मुलुंडवासीयांना अनुभवता येणार आहे.

अस्सल कोकणी संस्कृतीचा ‘कोकण महोत्सव 2022’ मुलुंडमध्ये होत असून या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचा भरगच्च कार्यक्रम मुलुंडवासीयांना अनुभवता येणार आहे. येत्या बुधवार पासून हा महोत्सव सुरू होणार असून तो 4 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. या महोत्सवात होम मिनिस्टर, दशावतार नृत्य, डबलबारी, मंगळागौर, लोकगीते-कोळीगीते, बॅण्ड पथक, मनोरंजपर कार्यक्रम, साईगीते आणि अनेक बक्षिसांची लयलूट होणार आहे.

भारतीय जनता पक्ष, मुलुंड सेवा संघ आणि मुलुंड महिला बचत गट यांच्या संयुक्तविद्यमाने या महोत्सवाचे आयोजन केले असून माजी नगरसेवक आणि मुलुंड सेवा संघाटे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांच्या पुढाकारातून हा महोत्सव होत आहे. मुलुंड तालुका क्रिडा संकुल, वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालयालगत निलम नगर फेज -2 मुंलुंड (पु.) येथे बुधवार (23 नोव्हेंबर) रोजी पासून 4 डिसेंबर रोजी पर्यंत सायंकाळी 6 वाजलेपासून रात्री 10 वाजेपर्यंत हा महोत्सव असणार आहे.
बुधवारी (दि.23) सायंकाळी 6 वाजता या महोत्सवाचा उदघाट्न सोहळा होणार आहे, त्यानंतर नादब्रह्म संगीत विद्यालय प्रस्तुत ‘अमृतवाणी’ मराठी हिंदी गाण्यांचा सुरेल कार्यक्रम होणार आहे.

गुरुवारी (दि.24) साईगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर शुक्रवारी (दि.25) श्री देवी भवानी दशावतार नाट्य मंडळ (मुनगे-देवगड) च्या डोंबिवली शाखेचा दशावताराचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (दि.2६) कमाल गिते आणि धमाल नृत्यांचा कार्यक्रम होणार आहे. तर रविवार (दि.27) रोजी महिलांसाठी खास होम मिनिस्टर- हा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (दि.28) रोजी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना आश्चर्यचकीत करणाऱ्या अशा जादूच्या प्रयोगाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
हे सुद्धा वाचा :
VIDEO : महाराष्ट्रातील प्रत्येकाने ‘या’ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे !

Rasana Founder : ‘रसना’ला शरबतचा नंबर 1 ब्रँड करणारे अरीज खंबाटा कालवश

Revenue Department : जमीनजुमल्याच्या किचकट समस्यांची उत्तरे एका क्लिकवर; महसूल विभागाने केले लोकांच्या 5000 समस्यांचे निराकरण

मंगळवारी (दि.29) रोजी किरण संतोष शितकर आणि मंडळी, दिवा (ठाणे) यांचा नवदुर्गा मंगळागौर कार्यक्रम होणार आहे. बुधवार (दि.30) रोजी महेश नाईक (मालवण) विरूद्ध कृष्णा सांगवेकर (ठाणे) यांचा डबलबारी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार (दि.1) रोजी बँड पथक (म्युझिकल संगीत) कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी (दि.2) रोजी लोकगीते आणि कोळीगीतांचा कार्यक्रम होणार असून शनिवार (दि.3) आणि रविवार (दि.4) रोजी स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम आणि बक्षिस वितरण समारंभ पार पडणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी