30 C
Mumbai
Saturday, September 16, 2023
घरमुंबईअखेरीस लालबागच्या राजाचे दर्शन! मूर्ती पाहताच प्रसन्न होईल मन..

अखेरीस लालबागच्या राजाचे दर्शन! मूर्ती पाहताच प्रसन्न होईल मन..

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे पहिले दर्शन शुक्रवारी गणेशभक्तांना पाहायला मिळाले. हा कार्यक्रम शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. गणपती आगमनासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक असताना लालबागच्या राजाच्या दर्शनाने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.

येत्या १९ सप्टेंबर पासून गणपती उत्सवाला सुरुवात होत आहे. तब्बल अकरा दिवस राज्यात दणक्यात हा उत्सव साजरा केला जातो. मुंबईत लालबागचा राजा नवसाला पावतो अशी भक्तांची धारणा आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी पाहायला मिळते. कित्येकदा चोख पोलिस बंदोबस्त असूनही भक्तांची रांग आवरण्यात मंडळ प्रशासन आणि पोलिसांची कसरत पाहायला मिळते. लालबागच्या राजाच्या दर्शना साठी परदेशातूनही भक्तगण लालबागला येतात. सिनेअभिनेता आणि अभिनेत्रीही लालबागच्या राजाचं आवर्जून दर्शन घेतात.

लालबागच्या राजाचे पहिले दर्शन.. विडिओ पहा!

संपूर्ण मुंबईभरात बाप्पाच्या आगमनाची आतुरता दिसून येत आहे. लालबाग येथील प्रत्येक स्थानिक गणपती मूर्तीकाराकडे यंदा तीनशेहून अधिक गणपती मूर्तीची ऑर्डर मिळाली आहे. “माझ्याकडे असे ग्राहक आहेत जे वर्षानुवर्षे माझ्याकडे येत आहेत. काहींना गणपती मूर्ती लालबागचा राजा, दगडूशेठ गणपती किंवा टिटवाळ्यातील ‘बैठक’ स्टाईलची असावी असे वाटते. या तीन प्रकारच्या मूर्ती सर्वाधिक विकल्या जातात,” असे मूर्तिकार म्हणाले.

“आम्ही गेल्या १२ वर्षांपासून या व्यवसायात आहोत. काही भक्तगण गणेश चतुर्थीच्या दिवशी किंवा उत्सवाच्या एक दिवस आधी मूर्ती बुक करण्यासाठी येतात, त्यांच्यासाठीही आमच्याकडे गणपती मूर्तीचा अतिरिक्त साठा आहे,” असेही मूर्तिकार म्हणाले.

हे ही वाचा

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही टोलमाफी, शिंदे सरकारचा निर्णय

गणेशोत्सव 2023: शेजारी राज्यांना ‘या’ जिल्ह्यातील मूर्तिकार पाठवत आहेत दीड लाख गणेश मूर्ती

गणरायासाठी थर्माकोलच्या मखरांऐवजी सजावटीसाठी कोणत्या वस्तू बाजारात मिळतायत ?

“आमचे जुने ग्राहक कित्येक वर्षांपासून टिकून आहेत. त्यामुळे या व्यवसाया बाबत आम्ही निश्चिन्त आहोत,” असेही एका मूर्तिकाराने सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी