29.9 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरमुंबईलता मंगेशकर यांची पहिली पुण्यतिथी, आशिष शेलारांच्या पुढाकाराने 'लतांजली'चे आयोजन !

लता मंगेशकर यांची पहिली पुण्यतिथी, आशिष शेलारांच्या पुढाकाराने ‘लतांजली’चे आयोजन !

लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजापुढे प्रत्येक गायक नतमस्तक होतो. लता दीदींचे गाणे प्रत्येकाच्या हृदयाला भिडले आहे. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा पहिला स्मृतिदिन येत्या सोमवारी म्हणजेच ६ फेब्रुवारीला आहे. त्यानिमित्त लता दीदींच्या संगीतमय कारकीर्दिच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘लतांजली’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्यावतीने मुंबईतल्या षणमुखानंद सभागृहात ठीक ६.३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. (Lata Mangeshkar’s first death anniversary, ‘Latanjali’ organized by Ashish Shelar!)

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक बेला शेंडे, साधना सरगम, शरयु दाते, निरूपमा डे हे लतादीदींनी गायलेली गाणी प्रस्तुत करणार आहेत. दीदींच्या गाण्यांमुळे नावलौकीक मिळालेल्या अभिनेत्रीदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे मुंबई पोलिस दलाच्या बँड पथकाकडून लता मंगेशकर यांची गाणी सादर करून त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे, असं शेलार यांनी सांगितलं आहे.

गानकोकिळा, गानसम्राज्ञी, क्वीन ऑफ मेलोडी अशा विविध उपाधिंनी प्रसिद्ध असणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) या एक महान भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. तब्बल सात दशके चित्रपट संगीत क्षेत्रात अविश्वसनीय कारकीर्द घडवणाऱ्या लतादीदींचा राजकारण, कला–क्रीडा आणि गायन क्षेत्रातील लोकांवर खूप मोठा प्रभाव होता.

हे सुद्धा वाचा :  ‘लय भारी’च्या शिरपेचात मानाचा तुरा; तुषार खरात यांना अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार

ठाकरेंच्या बिल्डरधार्जिण्या धोरणामुळे गुदमरली मुंबई; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

भाजपचा पोलखोल शिवसेनेचा डब्बा गोल : आशिष शेलार यांची ठाकरे सरकारवर टीका

संगीतातील असामान्य कामगिरीमुळे लता मंगेशकर यांना भारत सरकारचे पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न असे अत्यंत मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तसेच दादासाहेब फाळके पुरस्कार आणि “वन टाइम अवॉर्ड फॉर लाइफटाइम अचिव्हमेंट” या पुरस्कारांनी देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.

लतादीदी आयुष्यभर एकदम साध्या पेहरावात वावरल्या. तसेच त्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांत देखील नेहमी सहभागी असायच्या. लतादीदींनी सन २००१ मध्ये लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनद्वारे पुण्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना केली.

लतादीदींनी तब्बल सात दशके संगीत क्षेत्रात अतुल्य कामगिरी केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांसाठी त्या प्रेरणास्रोत आणि आदर्शवत गायिका ठरलेल्या आहेत. प्रत्येक भारतीय नागरिकाला लतादीदींचा सार्थ अभिमान आहे. दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ रोजी अशा या महान गानसम्राज्ञीचे मुंबईत निधन झाले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी